पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) राजकारणात आज एका अनपेक्षित घडामोडीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे उपमहापौर पदासाठी उमेदवार म्हणून नाव जाहीर करूनही, विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांनी हे पद स्वीकारण्यास ठाम नकार दिला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलली असून, आता प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेविका शर्मिला बाबर यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे ‘लॉटरी’ म्हणून पाहिले जात (PCMC Politics)आहे.
नेमके काय घडले?
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने महापौर पदासाठी रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत, उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांची निवड निश्चित केली होती. प्रदेशाध्यक्षांचे पत्र जिल्हाध्यक्षांकडे पोहोचल्यानंतर शिंदे पद स्वीकारतील, अशीच अपेक्षा होती. मात्र, “मला कोणतेही पद नको. मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेन,” अशी स्पष्ट भूमिका घेत शिंदे यांनी अचानक नकार दिल्याने पक्षासह राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात (PCMC Politics) आहे.
नकारामागील राजकीय कारण?
शीतल शिंदे हे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पक्षाने त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानण्यास सांगितल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा पीसीएमसी भवनात सुरू आहे. अपेक्षित सन्मानजनक पद न मिळाल्यामुळे त्यांनी थेट नकार देत पक्षाच्या नेतृत्वासमोर नवा पेच निर्माण केला असल्याचे बोलले जात(PCMC Politics) आहे.
शर्मिला बाबर यांची दावेदारी कशी मजबूत?
शीतल शिंदे यांच्या नकारानंतर भाजपने तत्काळ पर्यायी उमेदवाराचा शोध घेत शर्मिला राजू बाबर यांचे नाव पुढे केले आहे. त्यांनी उपमहापौर पदासाठी अधिकृत अर्जही दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक १५ (जागा क) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता साने यांचा तब्बल ५,९४९ मतांनी पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता. अनुभवी माजी नगरसेविका, पक्षातील सक्रिय सहभाग आणि मोठे मताधिक्य यामुळे शर्मिला बाबर यांची उमेदवारी मजबूत मानली जात(PCMC Politics) आहे.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले(PCMC Politics) आहे.
