Home महाराष्ट्र Pratibha Jr College :राज्यस्तरीय मूल्यांकनात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला ‘अ प्लस +’ श्रेणी; पिंपरी-चिंचवडमधील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयाचा मान

Pratibha Jr College :राज्यस्तरीय मूल्यांकनात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला ‘अ प्लस +’ श्रेणी; पिंपरी-चिंचवडमधील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयाचा मान

चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला राज्यस्तरीय मूल्यांकनात ‘A+’ श्रेणी; पिंपरी-चिंचवडमधील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयाचा मान.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. २४ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या वतीने 2024-2025 या शैक्षणिक वर्षात राज्यभर राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता व मूल्यांकन व आश्वासन (SQAAF) प्रक्रियेत चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला ‘अ प्लस +’ श्रेणी प्राप्त झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून ही मानांकन मिळवणारे ते एकमेव कनिष्ठ महाविद्यालय ठरले (Pratibha Jr College) आहे.

राज्यातील तब्बल 1,02,675 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अत्यंत काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कार्यक्षमता, विद्यार्थ्यांची प्रगती, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी आदी विविध निकषांवर छाननी करण्यात आली. या प्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 429 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ‘अ प्लस +’ श्रेणी बहाल करण्यात (Pratibha Jr College)आली.

 

या गौरवशाली यादीत चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा समावेश होणे ही संस्थेसाठी तसेच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. स्वयंअर्थसहाय्यित स्वरूपातील या कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण केला (Pratibha Jr College) आहे.

या यशामागे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा आणि संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे समर्पित कार्य, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची मेहनत, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि पालकांचा सक्रिय सहभाग यांचा मोठा वाटा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती यामुळे या महाविद्यालयाने राज्यपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली (Pratibha Jr College) आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव डॉ. दीपक शहा, संचालक डॉ. तेजल शहा आणि खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा (Pratibha Jr College) दिल्या.

भविष्यातही प्रतिभा ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श कायम राखेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला (Pratibha Jr College) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00