पिंपरी-चिंचवड : राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ (SQAAF) या उपक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ६८५ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र, यापैकी केवळ ६ शाळांना ‘A+’ ही सर्वोच्च श्रेणी मिळाल्याने उर्वरित ६७९ शाळांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले (SQAAF Result ) आहे.
शहराचा मान वाढवणाऱ्या ‘सुपर ६’ शाळा
पिंपरी-चिंचवडमधील ‘A+’ श्रेणी मिळविणाऱ्या शाळा पुढीलप्रमाणे —
Hindustan Antibiotics School (माध्यमिक विभाग, पिंपरी)
Shri Mhalsakant Vidyalaya
Dnyanprabodhini Navnagar Vidyalaya
Wisdom World School
Pratibha Junior College
S. B. Patil Public School
या शाळांनी विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत शहराचा मान उंचावला(SQAAF Result ) आहे.

असे झाले सखोल मूल्यमापन
या मूल्यांकनात केवळ शैक्षणिक निकालावर भर न देता शाळेचे प्रशासन, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, क्रीडा व कला क्षेत्रातील कामगिरी, व्यवसाय शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशा विविध घटकांची सखोल तपासणी करण्यात (SQAAF Result ) आली.
“पारदर्शक पद्धतीमुळे हे मूल्यांकन वास्तववादी झाले आहे,” असे प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी(SQAAF Result ) सांगितले.
शाळा प्रमुखांच्या प्रतिक्रिया
श्री म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी सांगितले की, “सुदृढ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळेच आमच्या शाळेला ही सर्वोच्च श्रेणी (SQAAF Result ) मिळाली.”
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी “विद्यार्थी-केंद्रित अध्यापन आणि कौशल्य विकासावर दिलेला भर” हे यशाचे गमक असल्याचे नमूद (SQAAF Result ) केले.
एच. ए. शाळेच्या प्रमुख दर्शना कोरके यांनी पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ‘व्यवसाय शिक्षण’ विभागाचे आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचे विशेष कौतुक(SQAAF Result ) केले.
उर्वरित शाळांसमोर आव्हान
‘A+’ श्रेणी मिळविण्यात अपयशी ठरलेल्या शाळांसमोर आता गुणवत्तावाढीचे मोठे आव्हान आहे. या निकालामुळे पालकांना शाळा निवडताना अधिक वस्तुनिष्ठ निकष उपलब्ध झाले(SQAAF Result ) आहेत.
काय आहे SQAAF आराखडा?
‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ (SQAAF) हा उपक्रम State Council of Educational Research and Training (SCERT) यांनी राबविला (SQAAF Result ) आहे.
पहिल्या टप्प्यात शाळांनी स्वयं-मूल्यांकन केले, तर दुसऱ्या टप्प्यात तज्ज्ञांमार्फत बाह्य मूल्यांकन करण्यात आले. गुणवत्ता, पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी विकास अशा कडक निकषांवर गुणांकन करण्यात(SQAAF Result ) आले.
राज्यभरातील १,०२,६७५ शाळांपैकी १०,७१२ शाळांचे बाह्य मूल्यांकन झाले असून त्यापैकी ४२९ शाळांना ‘A+’ श्रेणी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील केवळ ६ शाळांनी या सर्वोच्च श्रेणीवर आपले नाव कोरले (SQAAF Result ) आहे.
