प्रतिनिधी :आर.टी.ई. (RTE Admission Process) अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन आणि विनामूल्य राबविण्यात येत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने दिली आहे. या प्रक्रियेत अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी आणि प्रवेश निश्चिती हे सर्व टप्पे कोणत्याही शुल्काशिवाय पार पडतात. तसेच या प्रक्रियेत कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नसते, असेही स्पष्ट करण्यात आले (RTE Admission Process) आहे.
मात्र, अलीकडील काळात काही ठिकाणी आर.टी.ई. प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही व्यक्ती स्वतःला शाळा किंवा शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे भासवून प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवत आहेत. अशा प्रकारे पैसे मागणे किंवा देणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले (RTE Admission Process)आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, आर.टी.ई. अंतर्गत कोणालाही पैसे देऊन प्रवेश मिळवता येत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आधारित असून, संगणकीय लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अर्जाची पडताळणी केवळ सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केली जाते. त्यामुळे पैसे देऊन प्रवेश मिळेल, असे सांगणाऱ्यांपासून पालकांनी सावध (RTE Admission Process)राहावे.
पालकांनी घ्यावयाची काळजी :
कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
प्रवेश प्रक्रियेसाठी कोणालाही रोख, ऑनलाइन किंवा इतर कोणत्याही स्वरूपात पैसे देऊ नयेत.
केवळ शासनाच्या अधिकृत आर.टी.ई. पोर्टलवरूनच अर्ज करावा आणि अर्जाची स्थिती स्वतः पालकांनी (RTE Admission Process)तपासावी.
कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित शाळा किंवा अधिकृत केंद्रातच उपस्थित राहावे.
अधिकृत पावतीशिवाय कोणतीही रक्कम देऊ(RTE Admission Process) नये.
जर कोणी आर.टी.ई. प्रवेशासाठी पैशांची मागणी करत असेल, तर नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागालाही याबाबत माहिती द्यावी. शक्य असल्यास संबंधित पुरावे जतन करून सादर करावेत. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले (RTE Admission Process)आहे.
शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी जोडलेला नाही. त्यामुळे पालकांनी सजग राहून अशा गैरप्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले(RTE Admission Process) आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. पालकांनी अधिकृत मार्गानेच अर्ज(RTE Admission Process) करावा.”
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “ही प्रक्रिया संगणकीकृत व नियमांनुसार राबविण्यात येते. प्रवेशासाठी पैसे मागणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली (RTE Admission Process)जाईल.”
उपायुक्त (शिक्षण) ममता शिंदे यांनीही स्पष्ट केले की, “आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश प्रक्रिया विनामूल्य असून काहीजण चुकीची माहिती देऊन पालकांची दिशाभूल करत आहेत. अशा प्रकरणांवर कडक कारवाई केली(RTE Admission Process) जाईल.”
