Home माझं पिंपरी चिंचवड Vishwakarma Puja:श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Vishwakarma Puja:श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

पिंपरी-चिंचवडच्या रावेत परिसरात श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सृष्टीचे सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरी करण्यात आली.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. ३ :रावेत येथे पिंपरी-चिंचवड श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सृष्टीचे सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात (Vishwakarma Puja) आली.

यावेळी प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन श्री अंकित व सौ. खुशबू वाजा, श्री सागर व सौ. तेजल सुद्रा, श्री अग्नीक व सौ. मीरा काटेलिया यांच्या हस्ते विधीपूर्वक करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला(Vishwakarma Puja) होता.

या कार्यक्रमास पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी (Vishwakarma Puja) केले.

जयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया, सुधीर वाजा, रमेश पडियाळ, प्रतीक सुद्रा, बाबू गोढानिया, जया वाढीया, भानू चुडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा, भारती वाढीया, हर्षा वाजा आदींचा समावेश (Vishwakarma Puja) होता.

श्री विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने भक्तीगीते, अन्नदान, रास गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले (Vishwakarma Puja) होते.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00