Home पुणे NCP Chinchwad:राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा महिला कार्याध्यक्षपदी वैशाली संदेश काटे यांची नियुक्ती

NCP Chinchwad:राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा महिला कार्याध्यक्षपदी वैशाली संदेश काटे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा महिला कार्याध्यक्षपदी वैशाली संदेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

by Admin
Spread the love

चिंचवड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा महिला कार्याध्यक्षपदी वैशाली संदेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र (NCP Chinchwad)प्रदान केले. 

 

नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्या सक्रियपणे कार्य करतील. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी आपले योगदान देतील, असा विश्वास कविता आल्हाट यांनी व्यक्त (NCP Chinchwad)केला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत वैशाली काटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, उपाध्यक्ष अश्विनी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते संदेश महादेव काटे, दिपाली संतोष काटे, प्रियांका राहुल काटे, वैभव अभंग मुळे, गणेश वाघमारे, प्रशांत सोनटक्के आदी मान्यवर (NCP Chinchwad)उपस्थित होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00