प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर दोन प्रभागांतील चार जागांच्या आरक्षणात राज्य निवडणूक आयोगाने अचानक बदल केले आहेत. ओबीसी महिला आरक्षणातील विसंगती लक्षात आल्याने आयोगाने ही दुरुस्ती केली असून, त्यामुळे प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील आरक्षणाचे संपूर्ण चित्र बदलले (PCMC Reservation Changes )आहे.
कुठे झाले बदल?
प्रभाग क्रमांक ३० मधील ओबीसी प्रवर्गातील ‘क’ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील ‘ब’ जागेवरील ओबीसी महिला आरक्षण रद्द( PCMC Reservation Changes)झाले.
तसेच, प्रभाग क्रमांक ३० मधील ‘ड’ जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून, ती जागा सर्वसाधारण श्रेणीत वर्गीकृत करण्यात आली. त्यानुसार प्रभाग क्रमांक १९ मधील ‘क’ जागा सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाली(PCMC Reservation Changes) आहे.
सोडतीनंतर का झाली दुरुस्ती?
निवडणूक नियमांनुसार –एखाद्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या एक किंवा अधिक जागा असतील आणि त्या जागा महिला प्रवर्गात नसतील, तर त्या प्रभागातील ओबीसी जागा महिलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक (PCMC Reservation Changes) असते.
ही तरतूद प्रभाग क्रमांक ३० मध्ये लागू झाली नव्हती.
यामुळे सोडतीत झालेली चूक दुरुस्त करण्याचे निर्देश आयोगाने दिले. त्यानुसार सुधारित आरक्षण जाहीर करण्यात(PCMC Reservation Changes) आले.
-दुरुस्तीचा इच्छुकांवर परिणाम
या बदलाचा सर्वाधिक परिणाम प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील इच्छुक उमेदवारांवर होणार आहे. काहींचे आरक्षण कमी झाले तर काहींसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे.
तथापि, हा बदल पूर्णपणे नियमांनुसार करण्यात आल्याचा दावा निवडणूक विभागाने केला(PCMC Reservation Changes) आहे.
१७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांना नव्या आरक्षणाबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी(PCMC Reservation Changes) दिली.
—
बदलानंतरचे नवीन आरक्षण (प्रभागनिहाय)
प्रभाग क्रमांक १९ : उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ – अनुसूचित जाती – महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण (महिला)
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३० : दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती – महिला
क – ओबीसी (महिला)
ड – (PCMC Reservation Changes)सर्वसाधारण
