Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Election 2025:मतदार यादीतील घोळ; चार दिवसांत तब्बल 1,693 हरकती दाखल

PCMC Election 2025:मतदार यादीतील घोळ; चार दिवसांत तब्बल 1,693 हरकती दाखल

हरकती अ क्षेत्रीय कार्यालयात नोंद. उमेदवार व राजकीय पक्षांकडून मोठी नाराजी.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील विसंगतींवरून शहरभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यास सुरुवात केली असून, केवळ सोमवारीच (दि. 24) तब्बल 434 हरकती दाखल झाल्या. गेल्या चार दिवसांत एकूण 1,693 हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता (PCMC Election 2025)वाढली आहे.

 

महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. 20) जाहीर केली. मात्र, अनेक प्रभागातील मतदारांना दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने संबंधितांत गोंधळ निर्माण झाला आहे. काही माजी नगरसेवकांची नावेही यादीतून गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर असंतोष अधिकच वाढला. यामुळे मोठ्या संख्येने हरकती आणि तक्रारी नोंदवल्या (PCMC Election 2025)जात आहेत.

 

शनिवारपर्यंत (दि. 22) 1,054 हरकती दाखल झाल्या होत्या. सोमवारी प्राप्त झालेल्या 434 हरकतींसह एकूण संख्या 1,693 वर पोहोचली (PCMC Election 2025)आहे.

 

कार्यालयनिहाय हरकतींचा तपशील

 

अ क्षेत्रीय कार्यालय : 946 हरकती (सर्वाधिक)

 

क क्षेत्रीय कार्यालय : 337

 

फ क्षेत्रीय कार्यालय : 212

 

ह क्षेत्रीय कार्यालय : 100

 

ग क्षेत्रीय कार्यालय : 35

 

ह क्षेत्रीय कार्यालय : 24

 

ब क्षेत्रीय कार्यालय : 13

 

ई क्षेत्रीय कार्यालय : 10

 

मतदार यादी कक्ष : 16

 

 

प्रारूप यादीतील चुकीमुळे वाढत चाललेल्या हरकतींना कसे हाताळायचे, हा प्रश्न आता महापालिका प्रशासनापुढे उभा (PCMC Election 2025) राहिला आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00