*पिंपरी : १४ जानेवारी २०२६:-* पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांचा सहभाग अधिक वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘पिंक बूथ’ स्थापन करण्यात आले आहेत. हा उपक्रम निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत (Women Participation)आहे.
शहरातील प्रमुख मतदान केंद्रांवर हे पिंक बूथ उभारण्यात आले असून, महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ व उत्साहवर्धक वातावरणात मतदान करता यावे, यासाठी या बूथचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या बूथवर महिला कर्मचारी, स्वयंसेविका व सुरक्षाकर्मी तैनात ठेवण्यात आले असून, मतदारांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत देण्यात येत (Women Participation)आहे.
पिंक बूथच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदानाबाबत जागृती वाढवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे तसेच लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, या बूथवर स्वच्छ, आकर्षक व सुरक्षित वातावरण ठेवण्यात आले असून महिला मतदारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या (Women Participation)आहेत.

