Home क्रीडा India vs England :भारताचा 7 धावांनी थरारक विजय; अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

India vs England :भारताचा 7 धावांनी थरारक विजय; अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना खऱ्या अर्थाने “हृदयाचा ठोका चुकवणारा” ठरला!

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी ) भारतीय संघाने नउपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत इंग्लंड संघावर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, पण भारताने संयम आणि अनुभवाच्या आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर हा महत्वपूर्ण सामना खिशात घातला आणि अंतिम फेरीत शानदार प्रवेश करत जेतेपदाकडे दमदार पाऊल (India vs England) टाकले .

संजूचा सलग दुसरा ‘सामनावीर’ किताब

प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन ने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवली. 89 धावांची त्याची अविस्मरणीय खेळी ही केवळ धावसंख्या नव्हती, तर संघाला विजयाच्या दिशेने नेणारा पाया होता. आक्रमक फटके, अचूक टाइमिंग आणि जबाबदारीची जाणीव यामुळे त्याला सलग दुसऱ्यांदा ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.त्याला शिवम दुबेनेही तितकीच समर्थ साथ देत 43 धावांची घणाघाती खेळी केली. मधल्या षटकांत त्याने इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडत धावगती वाढवली.महत्त्वाच्या क्षणी हार्दिक पांड्या आणि तिलक Varma यांनी स्फोटक फलंदाजी करत शेवटच्या षटकांत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यांच्या आक्रमक खेळीमुळे भारताने 20 षटकांत तब्बल 253 धावांची नॉकआउट सामन्यातील विक्रमी धावसंख्या उभारली. या डावात 19 षटकार आणि 18 चौकारांचा समावेश(India vs England) होता.

इंग्लंडची जिद्द; बेथलची ऐतिहासिक खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना जोश बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक लवकर बाद झाले. तरीही इंग्लिश संघाने कच खाल्ली नाही.22 वर्षीय जेकब बेथेल याने खेळलेली शतकी खेळी ही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्याच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीमुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्याने टी-20 नॉकआउट सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवत इतिहासात आपले नाव कोरले. मात्र दुसऱ्या टोकाला अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याची खेळी वांझोटी(India vs England) ठरली.

निर्णायक क्षणी बुमराहचा वार

बेथलच्या शानदार खेळामुळे हा सामना भारताच्या हातातून निसटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी भेदक गोलंदाजी करत सामन्याचे चित्र पालटले. अचूक यॉर्कर्स आणि शांत डोके यामुळे त्याने भारताला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले.  त्याला हार्दिक पांड्यानेही गोलंदाजीत मोलाची साथ दिली.जरी अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तरी संघाने एकत्रित प्रयत्नातून विजय (India vs England)साकारला.

वानखेडेवरील ऐतिहासिक रात्र

हा सामना वानखेडे स्टेडियम येथे रंगला. मैदानावरील प्रेक्षकांचा जल्लोष आणि टीव्हीसमोर बसलेल्या कोट्यवधी चाहत्यांचा उत्साह या सामन्याला अधिक संस्मरणीय बनवून गेला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते बॉलीवूडचे अनेक मोठमोठ्या ताऱ्यांच्या  प्रमुख उपस्थितीत हा सामना रंगला, यातही माजी विश्वविजेते कर्णधार महेंदसिंग धोनी, आणि रोहित शर्माची उपस्थिती विशेष होती.त्यांना भारतीय खेळाडूंनी अजिबात निराश केले नाही तर उलट जल्लोष करण्याची नामी संधी उपलब्ध करून (India vs England)दिली.

अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

आता भारताची अंतिम लढत 8 तारखेला नरेंद्र मोदी स्टेडियम येथे न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.विशेष बाब म्हणजे भारतीय संघाचा इतिहास टी -20 च्या सामन्यात यांच्या विरुद्ध नक्कीच खूप चांगला आहे त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामना जिंकून पुन्हा एक इतिहास घडवणार का याकडे सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले (India vs England)आहे.

दोन दमदार संघ आमनेसामने येणार असल्याने अंतिम सामना देखील तितकाच उत्कंठावर्धक होणार आहे.भारताने उपांत्य फेरीत दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि सामूहिक खेळी पाहता, आता संपूर्ण देशाची नजर ट्रॉफीकडे लागली(India vs England) आहे!

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00