Home क्रीडा India vs England : भारताचा 7 धावांनी थरारक विजय; अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

India vs England : भारताचा 7 धावांनी थरारक विजय; अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. जेकब बेथलच्या 105 धावांच्या झंझावाती खेळीने सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठेवला.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर काल असा एक सामना रंगला, जो क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात दीर्घकाळ जिवंत राहील. भारताने उभारलेला २५४ धावांचा डोंगर पाहता सामना जवळपास एकतर्फी होईल असे वाटत होते. भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत इंग्लंडसमोर भलीमोठी धावसंख्या उभी केली आणि स्टेडियममधील भारतीय चाहत्यांचा आत्मविश्वास आकाशाला भिडला. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, आणि त्याचे जिवंत उदाहरण कालच्या सामन्यात पाहायला (India vs England) मिळाले.

इंग्लंडचा डाव सुरू होताच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला अचूक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असल्याने इंग्लंडचा पराभव अटळ वाटत होता. पण त्याच वेळी मैदानावर उतरला २२ वर्षांचा तरुण – जेकब बेथल. त्याने खेळलेली खेळी म्हणजे जणू एखाद्या योद्ध्याची जिद्द आणि संघर्ष यांचे जिवंत उदाहरण(India vs England) होते.

४८ चेंडूत १०५ धावा, ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकारांच्या जोरावर त्याने भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः आक्रमण केले. अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत त्याने भारतीय संघाच्या गणितात अचानकच खळबळ उडवून दिली. त्याची फलंदाजी पाहताना काही क्षणांसाठी वानखेडेवरील प्रेक्षकही स्तब्ध झाले होते. सुरुवातीला त्याच्या विकेटसाठी प्रार्थना करणारे भारतीय चाहतेही काही वेळातच त्याच्या जिद्दीला दाद देत प्रत्येक फटक्यावर टाळ्या वाजवत(India vs England) होते.

भारतीय गोलंदाजांना त्याने विशेषतः लक्ष्य केले. विशेषत: वरुण चक्रवर्तीचा खराब फॉर्म त्याला महागात पडला. आत्मविश्वास ढासळलेला असल्याने त्याची गोलंदाजी बेथलने अक्षरशः फोडून काढली. त्याला विल जॅकनेही काही काळ चांगली साथ दिली आणि दोघांनी मिळून भारतीय संघावर दडपण आणले. एका टप्प्यावर सामना इंग्लंडच्या बाजूने झुकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र याच क्षणी भारतीय संघाने आपल्या अनुभव आणि जिद्दीचे दर्शन घडवले. अक्षर पटेलने घेतलेला अप्रतिम झेल हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्या एका क्षणाने इंग्लंडचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि भारताने पुन्हा सामन्यावर पकड मजबूत केली. शेवटी इंग्लंडचा डाव २४६ धावांवर थांबला आणि भारताने केवळ ७ धावांनी हा थरारक सामना जिंकत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश(India vs England) केला.

या सामन्यात भारताच्या फलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. सलामीवीर संजू सॅमसनने पुन्हा एकदा जबाबदारीची खेळी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मधल्या फळीत उपयुक्त फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली. त्यामुळेच भारताला २५४ धावांचा भक्कम स्कोअर उभा करता(India vs England) आला.

तरीही या विजयात काही धडेही दडलेले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेला अभिषेक शर्मा, अव्वल गोलंदाज वरुण चक्रवर्ती, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांची कामगिरी अपेक्षेइतकी प्रभावी दिसली नाही. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला या बाबींकडे निश्चितच गांभीर्याने लक्ष द्यावे (India vs England)लागेल.

आता अंतिम फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान उभे आहे. या फॉरमॅटमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध सातत्याने विजय मिळवले असले, तरी हा संघ कधीही कमी लेखण्यासारखा नाही. कारण हाच न्यूझीलंड संघ आहे ज्याने भारताला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत मायदेशात धक्का दिला आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आपला सर्वोत्तम खेळ करावाच (India vs England)लागेल.

तरीही कालचा विजय भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हा केवळ एक सामना नव्हता, तर जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाचा उत्सव होता. भारताने विजय मिळवला, पण जेकब बेथलसारख्या तरुण खेळाडूने आपल्या लढाऊ वृत्तीने संपूर्ण क्रिकेटविश्वाची मने (India vs England)जिंकली.

 

आता ८ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. करोडो भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा, विश्वास आणि शुभेच्छा भारतीय संघासोबत आहेत. इतिहास रचण्याची ही सुवर्णसंधी (India vs England)आहे.

चला तर मग, पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जोरदार जयघोष (India vs England)करूया

“भारत… भारत…!” 🇮🇳🏏

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00