Home माझं पिंपरी चिंचवड Maharashtra Budget :महाराष्ट्र अर्थसंकल्पावर लघुउद्योग संघटनेची प्रतिक्रिया; उद्योग धोरण 2025 व MSME साठी सकारात्मक पावले

Maharashtra Budget :महाराष्ट्र अर्थसंकल्पावर लघुउद्योग संघटनेची प्रतिक्रिया; उद्योग धोरण 2025 व MSME साठी सकारात्मक पावले

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पावर पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची सकारात्मक प्रतिक्रिया; उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 चे स्वागत, सूक्ष्म व लघुउद्योगांना कर्जसुविधा, इन्वेस्ट महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म व स्टार्टअपसाठी महाफंडाची मागणी.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून हा अर्थसंकल्प राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केली (Maharashtra Budget) आहे.

 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. या धोरणाअंतर्गत राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचे एकूण उत्पादन वाढवण्याचा उद्देश असून प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक क्लस्टरची स्थापना करण्याची योजना आहे. या माध्यमातून २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ हे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या धोरणामुळे सुमारे ५० लाख रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत (Maharashtra Budget)आहे.

 

या घोषणांचे स्वागत करताना बेलसरे यांनी सांगितले की, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पुरवठा साखळीतील सूक्ष्म व लघुउद्योगांनाही या धोरणाचा प्रत्यक्ष फायदा झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त (Maharashtra Budget)केली.

 

अर्थसंकल्पात सूक्ष्म व लघुउद्योगांना कर्जपुरवठा सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे उद्योगांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच राज्यातील सूक्ष्म व लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना बेलसरे यांनी नमूद केले की, बँका व वित्तीय संस्थांकडून उद्योगांना प्रत्यक्षात सुलभ कर्ज उपलब्ध होण्यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र विभाग किंवा आयुक्तालय स्थापन झाल्यास त्यांच्या विकासाला वेग मिळेल आणि उद्योगांची वार्षिक उलाढाल वाढण्यास मदत(Maharashtra Budget) होईल.

 

याशिवाय स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘महाफंड’ उभारून नवउद्योजकांना सुलभ वित्तपुरवठा केल्यास नव्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकेल, असेही बेलसरे यांनी नमूद (Maharashtra Budget) केले.

 

तसेच या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्राचा औद्योगिक व आर्थिक विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त (Maharashtra Budget)केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00