Home माझं पिंपरी चिंचवड Aparna Doke BJP:अपर्णा डोके यांचा भाजपमध्ये प्रवेश; चिंचवडगावमध्ये उमेदवारीवरून राजकीय खळबळ

Aparna Doke BJP:अपर्णा डोके यांचा भाजपमध्ये प्रवेश; चिंचवडगावमध्ये उमेदवारीवरून राजकीय खळबळ

माजी महापौर अपर्णा डोके यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. एबी फॉर्म मिळाल्याने राष्ट्रवादीला धक्का, चिंचवडगावमध्ये पक्षांतर्गत नाराजी उफाळली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू आणि माजी महापौर अपर्णा डोके यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होत असतानाही, अखेरच्या काही तासांत पक्षाने त्यांना अधिकृत एबी फॉर्म दिला. या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.

चिंचवडगाव मतदारसंघातून भाजपने सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अपर्णा डोके आणि योगेश चिंचवडे यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू मानले जाणारे माजी नगरसेवक राजू गावडे तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी उफाळून आली आहे.

अपर्णा डोके या सलग तीन वेळा नगरसेविका राहिल्या असून, त्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिंचवडगाव परिसरात त्यांनी विकासकामे आणि प्रभावी लोकसंपर्काच्या जोरावर सातत्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही काळापासून सुरू होती.

ऐनवेळी झालेल्या या प्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे निवडणूक रणांगण अधिक चुरशीचे बनले असून, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00