Home मनोरंजन Morya Gosavi Mahotsav:हिंदू मंदिर परिसरातील जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा — मंत्री नितेश राणे

Morya Gosavi Mahotsav:हिंदू मंदिर परिसरातील जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा — मंत्री नितेश राणे

चिंचवड येथे मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्यात मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मंदिरांच्या जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. धार्मिक स्थळांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :हिंदू मंदिरांच्या जमिनी व परिसरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हे पावित्र्यावर आघात असून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे अशा अतिक्रमणांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट (Morya Gosavi Mahotsav)केले.

 

चिंचवड येथे श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे अध्यक्षस्थानी होते. आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे तसेच विविध मान्यवरांची (Morya Gosavi Mahotsav)उपस्थिती होती.

 

राणे म्हणाले की, हिंदू समाजाने दाखवलेला विश्वास हेच कार्य करण्याचे बळ आहे. धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अतिक्रमणासारख्या गंभीर मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. मोरया स्थानाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच समाजातील शांतता, सद्भाव आणि धार्मिक समभाव यांचे रक्षण करण्यासाठी पवित्र स्थळांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद (Morya Gosavi Mahotsav)केले.

 

कार्यक्रमात चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांनी सोहळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडली. संजीवन समाधीची परंपरा, पवना नदीकाठी समाधीस्थळाची निवड यामागील आध्यात्मिक महत्त्व आणि सोहळ्यातील विविध धार्मिक उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. पवना नदी संवर्धनासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता (Morya Gosavi Mahotsav)त्यांनी मांडली.

आमदार शंकर जगताप यांनी देवस्थानच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनीही धार्मिक स्थळांच्या संवर्धनात समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित(Morya Gosavi Mahotsav) केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी केशव विद्वांस यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी (Morya Gosavi Mahotsav)यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00