Home पुणे MHADA: पुणे गृहनिर्माण योजनांच्या अर्जाची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

MHADA: पुणे गृहनिर्माण योजनांच्या अर्जाची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

MHADA पुणे गृहनिर्माण योजनांसाठी अर्जाची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली. नागरिकांच्या मागणी व उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून निर्णय.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) विविध गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत अर्जांची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ ठरवण्यात आली होती. त्यानंतर ती २१ नोव्हेंबर ২০২५ पर्यंत वाढविण्यात (MHADA Pune)आली होती.

 

तथापि, अनेक नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी होत असल्याने आणि याद्वारे दिसून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून मंडळाने अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला (MHADA Pune) आहे.

इतर सर्व अटी व माहिती पूर्वी ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीप्रमाणेच लागू राहतील, असे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे (MHADA Pune) जाहीर केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00