Home पुणे Namaskar Mahotsav:नमस्कार महोत्सवात हास्य–नाट्य–संगीताची धमाल; ‘हास्यजत्रा’ व ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

Namaskar Mahotsav:नमस्कार महोत्सवात हास्य–नाट्य–संगीताची धमाल; ‘हास्यजत्रा’ व ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘हास्यजत्रा’ आणि ‘करून गेलो गाव’ या कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सांस्कृतिक, हास्य व नाट्य पर्वणीने पिंपरीत उत्साह.

by Admin
Spread the love

 प्रतिनिधी:नमस्कारफाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय नि:शुल्क ‘नमस्कार महोत्सव २०२५’ मध्ये सलग दोन दिवस प्रेक्षकांनी हास्य, नाट्य, संगीत आणि कलेची पर्वणी अनुभवली. महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे सुरू असलेल्या या महोत्सवात गुरुवार आणि शुक्रवारचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत (Namaskar Mahotsav ) रंगले.

 

गुरुवार, ०४ डिसेंबर रोजी, शरद जाधव प्रस्तुत एकपात्री कार्यक्रम ‘हास्यजत्रा’ ने उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले. एस.टी. स्टॅण्डवरील गंमतीजमती, ‘पांडातात्या’ या इरसाल राजकारण्याचे कारनामे, सरपंचीण रखमाबाईचा गावरान ठसका, ग्रामीण तरुणांचा वाढता लग्नप्रश्न, मुलगी पाहणीतील विनोद, महिलांची दागिन्यांची हौस आणि निर्मलग्राम योजनेतील फसणाऱ्या गोष्टी—या सर्वांची अनुभूती देताना जाधव यांनी हास्याच्या माध्यमातून माणुसकीचा अंतर्मुख करणारा संदेशही दिला. ठसकेबाज विनोदात नकळत येणाऱ्या वास्तवाने अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या  (Namaskar Mahotsav)कडा भरून आल्या.

यापूर्वी ऑर्केस्ट्रा मिलेनियम स्टार या संगीतवृंदाने “कजरा मोहब्बतवाला…”, “एक नंबर तुझी कंबर…”, “झिंग झिंग झिंगाट…”सह जुन्या-नव्यांच्या सुरेल गाण्यांचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा तालावर थिरकणारा सहभाग विशेष ठरला. प्रियंका पांडे यांनी सादर केलेल्या लावणीने सभागृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा जल्लोष (Namaskar Mahotsav)उसळला.

कार्यक्रमादरम्यान समाजकार्य करणाऱ्या सलीम शिकलगार, सरिता साने आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी कलाकारांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रियंका आचार्य (Namaskar Mahotsav)यांनी केले.

दरम्यान, ०३ डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपमहापौर शैलजा मोरे, सलीम शिकलगार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नमस्कार फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची, विशेषत: कोविड काळातील ‘रोटी बँक’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. शब्दरंग कला–साहित्य कट्टा संस्थेच्या ज्येष्ठ कलाकारांनी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमातून विविध कलांची प्रस्तुती सादर केली.

करून गेलो गाव’ विनोदी नाटकानं उडवला हशांचा फव्वारा

शुक्रवार, ०५ डिसेंबर रोजी, राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित दोन अंकी ‘करून गेलो गाव’ या विनोदी नाटकाने महोत्सवाला आणखी रंगत आणली. मालवणी बोलीची चटपटीत शैली, द्वयर्थी संवाद आणि कलाकारांचे अचूक टायमिंग यांनी प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केले.

 

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम (अण्णा) यांनी नाटकाचा केंद्रबिंदू ठरवत उपस्थितांना क्षणभरही उसंत दिली नाही. त्यांना ओंकार भोजने, उषा साटम, नुपूर दुडवडकर, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, प्रणव जोशी, सुमीत सावंत, दीपक लांजेकर आणि सचिन शिंदे यांची समर्थ साथ लाभली.

 

वे‌डगाव बुद्रूक या काल्पनिक गावात ग्रामस्थ नाटक बसवण्यासाठी तयारी करतात; पण स्थानिक आमदार बकुळा या नर्तकीचा कार्यक्रम करण्याची हटवादी मागणी करतो—या कथानकाभोवती उलगडणारे प्रसंग, वेगवान हालचाली, आकर्षक नेपथ्य आणि नृत्यसूरांनी नाटकाला विशेष उंची मिळाली.

मध्यांतरात नमस्कार महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले.

सांस्कृतिक वैभवाचा उत्सव

नमस्कार फाउंडेशनचा ‘नमस्कार महोत्सव २०२५’ संगीत, हास्य, नाट्य, कला यांचा संगम ठरला असून, समाजाचे शारीरिक-मानसिक-सांस्कृतिक आरोग्य सुदृढ करण्याचा उद्देश पुन्हा एकदा या महोत्सवाने अधोरेखित केला. सलग दोन दिवस प्रेक्षकांच्या आनंद, हास्य आणि मनमोकळ्या सहभागाने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण रंगत गेले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00