प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती अखेर तुटल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केली. येणारी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट (Mahayuti Crisis) केले.
या निर्णयामागील भूमिका मांडताना खासदार बारणे म्हणाले की, सन्मानजनक जागावाटपासाठी शिवसेनेने शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे युती टिकू शकली नाही. शिवसैनिकांचा स्वाभिमान आणि पिंपरी–चिंचवड शहराची अस्मिता जपण्यासाठी स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असे त्यांनी ठामपणे (Mahayuti Crisis)सांगितले.
या घोषणेमुळे महायुतीत मोठी दरी निर्माण झाली असून, शिवसेना आता महापालिकेच्या सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भाजपसमोर आता स्वबळावर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले(Mahayuti Crisis) आहे.
या नव्या राजकीय घडामोडींमुळे पिंपरी–चिंचवडमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि शिवसेना (स्वतंत्र) अशी तिरंगी अथवा बहुकोणीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानानंतर शहराची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत स्पष्ट चित्र समोर(Mahayuti Crisis) येणार आहे.
