प्रतिनिधी:महापालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील नाव नोंदणी, दुरुस्ती आणि वगळणी याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होत आहेत. मतदार यादी कक्षाने 27 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण 4,489 हरकती आणि तक्रारी नोंदवण्यात (PCMC Voter List Ojections )आल्या आहेत.
गुरुवारी (27 नोव्हेंबर) एकाच दिवशी 1,141 नवी प्रकरणे विविध कार्यालयांमध्ये दाखल झाली. यामध्ये नमुना ‘अ’ आणि ‘च’ मधील हरकती, तक्रारी तसेच तपासणी योग्य(PCMC Voter List Ojections) प्रकरणांचा समावेश आहे.
कार्यालयनिहाय आलेल्या हरकतींची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
मतदार यादी कक्ष : आज 13, एकूण 62
‘अ’ कार्यालय : आज 125, एकूण 1,151
‘ब’ कार्यालय : आज 78, एकूण 206
‘क’ कार्यालय : आज 239, एकूण 1,067
‘ड’ कार्यालय : आज 276, एकूण 417
‘इ’ कार्यालय : आज 8, एकूण 81
‘फ’ कार्यालय : आज 85, एकूण 552
‘ग’ कार्यालय : आज 214, एकूण 560 (यापैकी 11 दुबार नोंदी)
‘ह’ कार्यालय : आज 103, एकूण 393
नमुना ‘अ’ व ‘च’ मधील प्रकरणांमध्ये आज दाखल झालेल्या 1,141 हरकतींमध्ये 843 हरकती नमुना ‘अ’ मधील असून 76 तक्रारी नमुना ‘च’ मधील आहेत. तसेच 222 प्रकरणे तपासणीसाठी प्रलंबित आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर सक्रियपणे मतदार यादीतील त्रुटी दाखवत आहेत. नाव, पत्ता, वय दुरुस्ती, मृत मतदारांचे वगळणे आणि नव्या मतदारांची नोंदणी—सर्वच बाबींवर नागरिक (PCMC Voter List Ojections )तक्रारी मांडत आहेत.
महापालिका प्रशासनाने सर्व हरकतींची काटेकोर पडताळणी करून अंतिम मतदार यादी वेळेत प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट( PCMC Voter List Ojections)केले आहे.
