Home माझं पिंपरी चिंचवड Job Mela Pcmc:पिंपरी चिंचवड मोफत रोजगार मेळावा २०२५ |

Job Mela Pcmc:पिंपरी चिंचवड मोफत रोजगार मेळावा २०२५ |

१८-३५ वयोगटातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. येथे लगेच नोंदणी करा.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महापालिका, समाज विकास विभाग, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर येथे मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. शहरातील विविध उद्योग क्षेत्रातील कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून युवक–युवतींना एका ठिकाणी विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महापालिकेने अधिकाधिक युवक–युवतींनी या मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले (Job Mela Pcmc) आहे.

 

या रोजगार मेळाव्यात रिटेल, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, मीडिया अँड एंटरटेनमेंट, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, आयटी आणि आयटीईएस, हेल्थकेअर, तसेच फार्मास्युटिकल्स यांसारख्या क्षेत्रांतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यात उपस्थित राहणे (Job Mela Pcmc) आवश्यक आहे.

 

हा रोजगार मेळावा शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ऑटो क्लस्टर येथे होणार आहे. उमेदवारांनी सहभागी होताना आधार कार्ड, पॅन कार्ड, गुणपत्रिका आणि दोन पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावेत, अशी माहिती समाज विकास विभागाने  (Job Mela Pcmc)दिली आहे.

 

नोंदणीसाठी Google Form लिंक:

Click Here to Register

  1. https://forms.gle/qxvhNJrVfb6o9v9e6

    Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00