प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार, दिनांक १४ मे २०२६ रोजी नवी सांगवी येथे ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग (पुणे), प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी (Shankar Jagtap) दिली.
नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून मेळाव्याला सुरुवात होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार(Shankar Jagtap) आहे.
या रोजगार मेळाव्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकणसह राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांतील नामांकित आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार असून, उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाणार (Shankar Jagtap)आहे.
पाचवी ते दहावी उत्तीर्ण, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय तसेच डिप्लोमाधारक उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले (Shankar Jagtap)आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून ५ हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सहभागी उमेदवारांना आयोजकांच्या वतीने विशेष ‘सहभाग प्रमाणपत्र’ देण्यात येणार (Shankar Jagtap)आहे.
अधिक माहितीसाठी ९९२१०९९२१४, ७३५००७९९५५ आणि ९८५०१७११११ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले (Shankar Jagtap)आहे.
प्रतिक्रिया :
“युवकांना रोजगारासाठी सक्षम व्यासपीठ आणि दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत तरुणांच्या कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ (Shankar Jagtap)घ्यावा.”
— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा कॉन्स्टिटयून्सी

