Home पुणे Begam Barve:बेगम बर्वे’ नव्या संचात रंगमंचावर मराठीसह विविध भाषांत गाजलेल्या नाटकाचा पुनर्प्रयोग

Begam Barve:बेगम बर्वे’ नव्या संचात रंगमंचावर मराठीसह विविध भाषांत गाजलेल्या नाटकाचा पुनर्प्रयोग

सतीश आळेकर लिखित गाजलेले ‘बेगम बर्वे’ नाटक नव्या कलाकारांसह पुन्हा रंगमंचावर. पुण्यातील प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यभर प्रयोगांचे नियोजन.

by Admin
Spread the love

पुणे : ललित कला केंद्रातील नाट्यप्रयोगांमधून अनेक प्रयोगशील कलाकृती रसिकांसमोर येत असतात. अशाच गाजलेल्या ‘बेगम बर्वे’ या नाटकाचा नव्या दमाच्या कलाकारांसह पुनर्प्रयोग सध्या रंगभूमीवर होत असून, रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत (Begam Barve)आहे.

 

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर लिखित ‘बेगम बर्वे’ हे नाटक तब्बल ४७ वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. १९७७ साली प्रथम सादर झालेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर हिंदी, मल्याळम, गुजरातीसह विविध भाषांमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले. राज्य नाट्य स्पर्धांमधून तसेच प्रयोगशील रंगभूमीवरही या नाटकाने आपली वेगळी ओळख कायम (Begam Barve)ठेवली.

 

नव्या संचामध्ये स्तिमीत साने, मयंक पाटणकर, समीर दिवाकर आणि ब्रह्मा हांडे हे ‘ललित’चे माजी विद्यार्थी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या प्रयोगाचे दिग्दर्शन गौरव काणेकर यांनी केले असून, निर्मिती निखिल चिंचकर आणि अनिल घेरडे यांनी केली(Begam Barve) आहे.

 

‘बेगम बर्वे’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील भावविश्व, व्यक्तिरेखांची सूक्ष्म मांडणी आणि प्रयोगशील शैली. आजच्या तरुण कलाकारांनी सादर केलेल्या नव्या आवृत्तीमुळे नाटकाला नवसंजीवनी मिळाली असून, प्रेक्षकांकडून त्याचे कौतुक होत(Begam Barve) आहे.

 

नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ‘द बॉक्स’ येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, समर नखाते आणि ऑर्गनवादक राजीव परांजपे उपस्थित होते. राज्यभर या नाटकाचे आणखी प्रयोग करण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला (Begam Barve)आहे.पुढील शो भरत नाट्य मंदिर पुणे येथे 6 जून रोजी होणार असल्याची माहिती अनिल घेरडे यांनी दिली


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00