Home माझं पिंपरी चिंचवड Bjp Raju Durge :भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज दुर्गे; बापू काटे यांच्या हस्ते नियुक्ती

Bjp Raju Durge :भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज दुर्गे; बापू काटे यांच्या हस्ते नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

by Admin
Spread the love

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे आणि संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली. भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते राज दुर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात (Bjp Raju Durge)  आले.

यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे यांनी राज दुर्गे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ते अभ्यासू, प्रभावी वक्ते आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणारे कार्यकर्ते आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी मांडणी, महापालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच विरोधकांकडून होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला ठोस उत्तर देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर भाजपची जनसंपर्क यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त (Bjp Raju Durge) केला.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना राज दुर्गे म्हणाले की, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे, विचारसरणी तसेच पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या विकासकामांची माहिती प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने कार्य करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त(Bjp Raju Durge)  केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00