Home गुन्हे Tata Motors Union:टाटा मोटर्स युनियन ऑडिओ प्रकरण : कलम ४६८ अंतर्गत गुन्हा, फॉरेन्सिक तपास सुरू

Tata Motors Union:टाटा मोटर्स युनियन ऑडिओ प्रकरण : कलम ४६८ अंतर्गत गुन्हा, फॉरेन्सिक तपास सुरू

टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या २०२४ निवडणुकीतील कथित बनावट ऑडिओ प्रकरणात अडीच वर्षांनंतर कलम ४६८, ४७१ आणि ५०२ अंतर्गत गुन्हा दाखल. व्हॉईस सॅम्पल, RFSL फॉरेन्सिक तपास आणि पुढील चौकशी सुरू.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तत्कालीन जनरल सेक्रेटरी संतोष दळवी यांच्या आवाजाचा कथित गैरवापर करून बनावट ऑडिओ क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात तब्बल अडीच वर्षांनंतर पोलिसांनी गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी), ४७१ आणि ५०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासाला आता वेग आला (Tata Motors Union) आहे.

जानेवारी २०२४ मध्ये युनियनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष दळवी यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषण कथितरीत्या एडिट करून बनावट ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच कामगार व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले (Tata Motors Union)आहे.

या प्रकरणी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित कारवाई न झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आवश्यक डिजिटल पुरावे सादर करण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याने तपास सुरू (Tata Motors Union) केला.

प्राथमिक तपासात संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये एडिटिंग करून छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ४६८, ४७१ आणि ५०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी कलम ४६८ हे फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी केल्याप्रकरणी लागू होणारे गंभीर कलम असून, त्याअंतर्गत कमाल सात वर्षांच्या कारावासाची तरतूद (Tata Motors Union) आहे.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ‘ई-साक्ष’ प्रणालीद्वारे संतोष दळवी यांचे व्हॉईस सॅम्पल स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत नोंदवून घेतले आहेत. तसेच संबंधित मोबाईल क्रमांकधारक संशयिताला चौकशीसाठी कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली(Tata Motors Union) आहे.

याशिवाय, निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित झालेली कथित एडिटेड ऑडिओ क्लिप पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली असून ती पुराव्यादाखल पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप आणि व्हॉईस सॅम्पल राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (RFSL) तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्पेक्ट्रोग्राम विश्लेषणाद्वारे ऑडिओमध्ये छेडछाड झाली आहे का, याबाबत वैज्ञानिक निष्कर्ष समोर येणार (Tata Motors Union) आहेत.

दरम्यान, तपास कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) च्या आधारेही केला जाणार आहे का, तसेच त्यासाठी संबंधित दूरसंचार कंपन्यांकडे माहिती मागविण्यात आली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे (Tata Motors Union) समजते.

तसेच, तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीने डिजिटल अथवा अन्य प्रकारचा पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी(Tata Motors Union) दिली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधला असता, “वेळ आल्यानंतर बोलेन,” एवढीच प्रतिक्रिया त्यांनी(Tata Motors Union) दिली.

या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित संशयित अथवा इतर संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार (Tata Motors Union)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00