Home व्यवसाय / अर्थ PCMC Big Scam :पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींचा बोगस बिल घोटाळा? भाजप नगरसेवकांच्या सह्यांमुळे खळबळ, सूत्रधार कोण?

PCMC Big Scam :पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींचा बोगस बिल घोटाळा? भाजप नगरसेवकांच्या सह्यांमुळे खळबळ, सूत्रधार कोण?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींच्या नियमबाह्य बिल प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून प्रस्तावावर भाजप नगरसेवकांच्या सह्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत नियमबाह्य पद्धतीने सुमारे ५२ कोटी रुपयांची बिले अदा केल्याच्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, या मुद्द्यावर सत्तारूढ भाजप आणि विरोधकांकडून प्रशासनावर जोरदार टीका सुरू झाली (PCMC Big Scam) आहे.

 

बोगस उपसूचनांच्या आधारे ही देयके दिल्याचे उघड झाल्यानंतर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीणकुमार जैन यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी होत (PCMC Big Scam) आहे.

 

दरम्यान, या प्रकरणातील वाढ-घट प्रस्तावावर स्थायी समितीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना करांडे (सूचक) आणि योगिता नागरगोजे (अनुमोदक) यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव स्थायी समिती सभापतींकडे न सादर करता थेट लेखा विभागाकडे पाठवण्यात आल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी(PCMC Big Scam) सांगितले.

 

या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चौकशीचे आदेश दिले असून, या प्रस्तावामागील खरा सूत्रधार कोण, याबाबत प्रशासन व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले(PCMC Big Scam) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00