प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील वाकड गावातील युवा कार्यकर्ते तुषार भूमकर यांचे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या भीषण अपघातात झालेल्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी(Tushar Bhumkar Wakad) आहे.
तुषार भूमकर हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय, अभ्यासू व सर्वांना आपलेसे वाटणारे युवा नेतृत्व म्हणून परिचित होते. समाजातील विविध प्रश्नांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी अनेकांचा विश्वास आणि स्नेह संपादन केला होता.
त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढवली होती. त्यामुळे भूमकर कुटुंबाचा सामाजिक व राजकीय क्षेत्राशी घनिष्ठ संबंध(Tushar Bhumkar Wakad) होता.
अशा उमद्या, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख युवा कार्यकर्त्याचे अकाली जाणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर वाकड परिसराची आणि सामाजिक-राजकीय क्षेत्राचीही मोठी हानी आहे.
ईश्वर दिवंगत तुषार भूमकर यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला व सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण(Tushar Bhumkar Wakad) श्रद्धांजली.
