Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Cultural Event:मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये कविसंमेलन; राज आहेर राव यांचे प्रभावी प्रतिपादन

PCMC Cultural Event:मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये कविसंमेलन; राज आहेर राव यांचे प्रभावी प्रतिपादन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविसंमेलन उत्साहात; कवी राज आहेर राव यांनी ‘कविता अंगात यायला हवी’ असे प्रतिपादन केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :“कविता अंगात यायला हवी…” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी राज आहेर राव यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विविध उपक्रमांसह मान्यवर कवींचे कविसंमेलन मोठ्या उत्साहात पार (PCMC Cultural Event ) पडले.

अध्यक्षीय भाषणात राज आहेर राव म्हणाले, “ज्याप्रमाणे अभंग, पोवाडे, भारूड, लावणी ऐकताना कलाकार आणि श्रोते दोघांच्या अंगात संचार होतो, त्याचप्रमाणे कविता सादर करतानाही ती कवीच्या अंगात यायला हवी. तेव्हाच ती जिवंत कविता ठरते.” कविसंमेलन म्हटले की रसिकांनी ऐकण्यासाठी गर्दी करावी, अशी सादरीकरणाची ताकद कवितेत असावी. मनोरंजनातून प्रबोधन साधणारी काव्यरचना ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट(PCMC Cultural Event ) केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थानिक साहित्यिकांसाठी परिपूर्ण, सुसज्ज सराव हॉल उपलब्ध करून द्यावा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांच्या साहित्य प्रकाशनासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांची सामूहिक अपेक्षा यावेळी व्यक्त (PCMC Cultural Event )झाली.

कार्यक्रमात कवी सुभाष चव्हाण यांनी प्रभावी शंखनाद सादर केला, तर अरुण बोऱ्हाडे यांच्या कवितेने गावाची सफर घडवून आणली. कवी सुहास घुमरे यांच्या “मी नाणेघाटात मराठीचे झाड लावलं” या कवितेने मराठी मातीतल्या नात्याची जिवंत जाणीव करून (PCMC Cultural Event )दिली.

यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील साहित्यिकांच्या वतीने विशेष अधिकारी किरण गायकवाड यांचा सन्मान करण्यात (PCMC Cultural Event )आला.

या कविसंमेलनात सुरेश कंक, अरुण बोऱ्हाडे, सविता इंगळे, मानसी चिटणीस, नेहा जाधव वार, हेमंत जोशी, डॉ. पौर्णिमा कोल्हे, चंद्रकांत धस, मीनल साकोरे, सुहास घुमरे, अण्णा जोगदंड, मनीष परिहार, दिनेश साबळे, वंदना इनानी, माधुरी विधाटे, नंदकुमार कांबळे आणि सीमा गांधी या मान्यवर कवींनी विविध काव्यप्रकारांतून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित(PCMC Cultural Event ) केले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण गायकवाड यांनी (PCMC Cultural Event )केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00