प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतिम टप्प्यात आली असून, १४ जानेवारी रोजी मतपेटी वाटप, १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रवेशबंदी व वाहतूक बदल जाहीर करण्यात आले (Road Closure Update) आहेत.
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यान्वये हे तात्पुरते आदेश निर्गमित केले असून, निवडणूक कामाशी संबंधित वाहने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना हे नियम लागू राहणार (Road Closure Update)आहेत.
भोसरी व चिखली परिसरात वाहतूक बदल
स्ट्राँग रूमच्या पार्श्वभूमीवर भोसरी व चिखली परिसरात मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत.भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणाकडे जाणारा वैष्णवी माता मंदिर रोड व इंद्रायणी स्वीट कॉर्नर चौक हा मार्ग १४ ते १६ जानेवारी दरम्यान सर्व वाहनांसाठी बंद (Road Closure Update) राहील.
चिखलीतील घरकुल टाऊन हॉलकडे जाणारे कृष्णानगर भाजी मंडई, पवार वस्ती व हरगुडे वस्ती येथील सर्व्हिस रोड देखील याच कालावधीत बंद असतील. नागरिकांनी या भागात प्रवासासाठी पुणे–नाशिक महामार्ग, सहारा चौक, साने चौक किंवा नेवाळे वस्ती हे पर्यायी मार्ग (Road Closure Update)वापरावेत.
निगडी प्राधिकरणात रस्ता बंद
निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन समोरील रस्ता बंद करण्यात आला असून, संभाजी चौकाकडून येणारी वाहतूक आकुर्डी पोलीस चौकी मार्गे हुतात्मा चौकाकडे वळवण्यात आली (Road Closure Update) आहे.
मतमोजणी दिवशी (१६ जानेवारी) विशेष निर्बंध
मतमोजणीच्या दिवशी, १६ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत, चिंचवडमधील ऑटो क्लस्टर परिसरात राजमाता जिजाऊ चौक ते काळेवाडी एम्पायर ब्रिज हा मार्ग पूर्णपणे बंद (Road Closure Update)राहील.
या परिसरातील वाहतूक राजमाता जिजाऊ चौकातून बसवेश्वर चौक किंवा जुने मोरवाडी कोर्ट मार्गे वळवण्यात आली आहे.बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही निर्बंध असतील. गोदरेज सर्कल ते राधा चौक दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, त्यांनी माण–हिंजवडी किंवा वाकड नाका मार्गे प्रवास (Road Closure Update)करावा.
मतदान दिवशी (१५ जानेवारी) जड वाहनांना बंदी
मतदानाच्या दिवशी मोशी व दिघी–आळंदी भागात काही रस्ते जड वाहनांसाठी बंद राहतील.मोशी गावठाणातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेजवळील बोराडेवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक दरम्यान सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश (Road Closure Update)नसेल.
चहोली येथील जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेकडे जाणारे साठेवस्ती व शितल फॅब्रिकेशन मार्ग देखील जड वाहनांसाठी बंद असतील. नागरिकांनी पांजरपोळ चौक, भारतमाता चौक, कोतवाल वस्ती किंवा बुर्डे वस्ती हे पर्यायी मार्ग (Road Closure Update)वापरावेत.
इतर प्रमुख वाहतूक बदल
थेरगाव येथील वेंगसकर अकॅडमी व तापकीर चौक परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल. येथे येणाऱ्या वाहनांनी एम.एम. चौक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वापरावा.कासारवाडीतील भाजी मंडई परिसरात हॉटेल वरुण ते हॉटेल विसावा हा मार्ग बंद असून, वाहतूक रेल्वे क्रॉसिंग किंवा स्मशानभूमी रोडने वळवण्यात आली आहे.वाकड येथील जगताप डेअरी ब्रिजवर १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार असून, नागरिकांनी कस्पटे चौक किंवा कोकणे चौक मार्गे (Road Closure Update)प्रवास करावा.
हे सर्व वाहतूक बदल गरजेनुसार टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार असून, नागरिकांनी संयम राखून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात (Road Closure Update)आले आहे.
