Home माझं पिंपरी चिंचवड Voter List Search:मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध

Voter List Search:मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ साठी मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मनपाकडून ऑनलाईन सर्च सुविधा सुरू. सारथी हेल्पलाईनचीही सुविधा.

by Admin
Spread the love

पिंपरी:चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे मतदारांना मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता ठळकपणे (लाल रंगात) पाहता येणार (Voter List Search) आहे.

ही सुविधा वापरण्यासाठी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांनी मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर

👉 www.pcmcindia.gov.in

उपलब्ध असलेल्या “Search Voter Name” या लिंकवर (Voter List Search) क्लिक करावे.

मतदारांना आपले नाव मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये शोधण्याची सुविधा देण्यात आली असून, ज्यांना आपला मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC नंबर) माहिती आहे, ते त्या क्रमांकाच्या आधारेही शोध घेऊ (Voter List Search)शकतात.

प्रभाग क्रमांक निवडून मतदाराचे प्रथम नाव, मधले नाव आणि आडनाव नोंदवल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदान केंद्र व इतर आवश्यक माहिती सर्चद्वारे उपलब्ध होणार (Voter List Search) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00