Home महाराष्ट्र Winter Session Issues:पिंपरी-चिंचवड विकासासाठी 15 मुद्दे: आमदार महेश लांडगे यांची तयारी

Winter Session Issues:पिंपरी-चिंचवड विकासासाठी 15 मुद्दे: आमदार महेश लांडगे यांची तयारी

हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक, जलपुरवठा, सुरक्षा, शिक्षण आणि विकासकामांवरील 15 प्रमुख मुद्द्यांवर आमदार महेश लांडगे ठोस मागण्या करणार आहेत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी भाजपा महायुती सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरसकट शास्तीकर माफीपासून आंद्रा–भामा–आसखेडसारख्या जलसिंचन योजनांपर्यंत पिंपरी-चिंचवडकरांच्या मूलभूत हक्कांना आता न्याय मिळू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ‘‘शाश्वत विकासाच्या दिशेने’’ पुढे जात आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडकरांच्या विविध प्रश्नांची पुन्हा एकदा सभागृहात मांडणी करणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. या अधिवेशनासाठी त्यांनी 15 महत्त्वपूर्ण (Winter Session Issues) मुद्यांची तयारी केली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथे सुरू होत आहे. विकासकामांना गती देणे, वाहतूक समस्यांवरील दीर्घकालीन उपाय, सार्वजनिक सुरक्षा, पायाभूत सुविधा, शिक्षण, जलपुरवठा आणि औद्योगिक वाढ या प्रमुख विषयांवर आमदार लांडगे सरकारसमोर ठोस मागण्या मांडणार (Winter Session Issues) आहेत.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून मोकाट कुत्रे हटवण्याचे निर्देश आहेत; तर ABC (Animal Birth Control) नियमांनुसार निर्जंतुकीकरण, लसीकरण करून त्यांना त्याच जागी सोडणे बंधनकारक आहे. या सर्व अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकसंध आणि कठोर धोरण जाहीर करून मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी (Winter Session Issues) केली.

तसेच, जुन्नर व पुणे ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. अन्नाच्या अभावामुळे बिबटे मानवी वसाहतींत प्रवेश करीत असल्याने धोका वाढला आहे. ज्या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठा उपद्रव आहे, त्या कुत्र्यांना पकडून बिबटप्रवण क्षेत्रात सोडण्याची व्यवस्था केल्यास बिबट्यांची मानवी वसाहतींकडे होणारी वर्दळ कमी होईल आणि मोकाट कुत्र्यांची समस्या सोडविण्यासही मदत होईल, असे आमदार लांडगे यांनी  (Winter Session Issues)नमूद केले.

आगामी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देऊन सखोल चर्चा करून ठोस निर्णय मिळवण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगराच्या आसपासच्या क्षेत्रात नागरीकरण आणि औद्योगिक वाढ वेगाने होत आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण–तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी भीषण स्वरूपात वाढत आहे. ‘‘सरकार प्रयत्नशील असले तरी काही प्रकल्पांना अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे उद्योग आणि IT क्षेत्रात नाराजी आहे,’’ असे आमदार लांडगे म्हणाले. यासाठी त्यांनी सरकारकडे खालील  (Winter Session Issues)मागण्या केल्या आहेत:

  • वाहतूक समस्यांवरील सर्व प्रकल्प ‘फास्टट्रॅक’वर आणावेत

  • पुणे रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादनातील अडथळे तातडीने दूर करावेत

  • राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण प्रक्रियेला गती द्यावी

  • पुणे–नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि मिसिंग लिंकचे काम गतीमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विशेष अधिकारी नियुक्त करावेत

  • संपूर्ण वाहतूक प्रश्नासाठी वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा

अधिवेशनात याशिवाय पुढील मुद्द्यांवरही लांडगे पाठपुरावा (Winter Session Issues) करणार आहेत:

  • CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करणे

  • एमसीव्हीसी शिक्षक भरती तातडीने मंजूर करणे

  • PCNTDA च्या 8,379 भूखंडांना फ्री-होल्डचा लाभ मिळवून देणे

  • पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी आणि चासकमान धरणातून पाणी आरक्षण निश्चित करणे

  • मोशी येथे मेडीसिटी प्रकल्प उभारणे

  • PMRDA च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राला छत्रपती संभाजी महाराज नाव देणे

  • आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या गृहयोजनांतील सदनिकाधारकांना दंडमाफी

  • कुदळवाडी–चिखली अतिक्रमणानंतर IT/Industrial Hub साठी धोरण निश्चित करणे

  • PMRDA मध्ये Education Hub (IIT–AIIMS–IIM झोन) साठी निर्णय घेणे

  • पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देणे

  • रेड झोन व ब्ल्यू लाईन रेडिरेकनर नियमांत सुधारणा

  • इव्हेंट–डेकोरेशन व्यावसायिकांसाठी वाहतूक नियम शिथिलता

‘‘पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षेपासून वाहतूक, पाणी, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणि प्राधिकरण अशा सर्वच विषयांवर ठाम आवाज उठवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती देण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकारकडून स्पष्ट व सकारात्मक निर्णय मिळतील, असा मला विश्वास आहे,’’ असे आमदार महेश लांडगे यांनी (Winter Session Issues) सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00