
पुणे _ कोथरूड परिसरात एका महिलेकडून गुंगीचे औषध पाजून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप एका विवाहित तरुणाने केला आहे. तसेच, खासगी छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी ४२ वर्षीय महिलेविरुद्ध (Honey Trap) गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत असे आणि ती उच्च न्यायालयात काम करत असल्याची बतावणी करीत होती. तक्रारदार तरुण हा मूळचा चंदगड (जि. कोल्हापूर)चा असून विवाहित आहे. काही काळापूर्वी तो कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला असताना त्याची ओळख संबंधित महिलेशी झाली. महिलेने ओळख वाढवत त्याला आपल्या जाळ्यात ओढल्याचे तक्रारीत म्हटले (Honey Trap)आहे.
तरुणाच्या म्हणण्यानुसार, एका भेटीदरम्यान महिलेनं त्याला गुंगीचे औषध पाजले आणि त्यानंतर त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत दोन लाख रुपये देण्याची मागणी करण्यात(Honey Trap) आली.
धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या महिलेच्या विरोधात यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे आहेत का, तसेच तिने इतरांचीही फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील (Honey Trap) तपास सुरु आहे.

