प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांच्या कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्रावर सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ढोले-पाटील यांना ६ मार्च रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले (Ravi Landge)आहेत.
लांडगे हे प्रभाग क्रमांक ६ धावडेवस्ती-भगतवस्ती येथून ओबीसी आरक्षित जागेतून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर समितीने प्राथमिक सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ढोले-पाटील यांनी ओबीसी आरक्षणातून निवडून आलेल्या इतर काही नगरसेवकांच्या प्रमाणपत्रांवरही आक्षेप घेतल्याची माहिती (Ravi Landge )आहे.
या प्रकरणी ढोले-पाटील यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महापौर लांडगे यांनी आपल्या प्रमाणपत्रावर ‘हिंदू-कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख असून सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा करत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला(Ravi Landge )आहे.
