Home माझं पिंपरी चिंचवड Makarand Nikam Vrs:PCMC शहर अभियंता मकरंद निकम यांचा VRS अर्ज; प्रशासनात खळबळ

Makarand Nikam Vrs:PCMC शहर अभियंता मकरंद निकम यांचा VRS अर्ज; प्रशासनात खळबळ

PCMC चे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सेवेत दीड-दोन वर्षे शिल्लक असतानाही स्वेच्छानिवृत्ती (VRS) साठी अर्ज केला असून प्रशासनात चर्चा रंगल्या आहेत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम (PCMC) यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) साठी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. सेवेत अंदाजे दीड ते दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी अचानक दिलेला हा अर्ज महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि खळबळ निर्माण करणारा ठरला  (Makarand Nikam Vrs)आहे.

 

माजी शहर अभियंता राजन पाटील यांच्या ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्तीनंतर मकरंद निकम यांना बांधकाम परवानगी विभागातून पदोन्नती देण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी २६ मे २०२२ रोजी ही पदोन्नती मंजूर केली आणि १ जून २०२२ पासून निकम यांनी शहर अभियंता(Makarand Nikam Vrs ) पदाचा कार्यभार स्वीकारला.

 

त्यांच्या कार्यकाळात महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली. रस्तेविकास, पायाभूत सुविधा उभारणी, इमारत विकास तसेच मोठ्या तांत्रिक प्रकल्पांना त्यांनी मंजुरी देत अंमलबजावणीत वेग आणला. अनेक प्रकल्प सध्या ( Makarand Nikam Vrs)अंतिम टप्प्यात आहेत.

https://youtube.com/watch?v=R50rZo-1hUc&si=CDLqhq0IkGD8Rw5b

दरम्यान, महापालिकेत शहर अभियंत्यांच्या समकक्ष दोन मुख्य अभियंता पदांची निर्मिती करण्यात आली असून त्या पदांवर संजय कुलकर्णी आणि प्रमोद ओंभासे कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर सेवेत अद्याप मुदत शिल्लक असतानाही निकम यांनी VRSचा पर्याय निवडल्याने प्रशासनात विविध तर्क-वितर्क (Makarand Nikam Vrs) सुरू झाले आहेत.

 

निकम यांच्या या अनपेक्षित निर्णयामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या अर्जाबाबतचा पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याची (Makarand Nikam Vrs) शक्यता आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00