प्रतिनिधी :चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम (PCMC) यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) साठी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. सेवेत अंदाजे दीड ते दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी अचानक दिलेला हा अर्ज महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि खळबळ निर्माण करणारा ठरला (Makarand Nikam Vrs)आहे.
माजी शहर अभियंता राजन पाटील यांच्या ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्तीनंतर मकरंद निकम यांना बांधकाम परवानगी विभागातून पदोन्नती देण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी २६ मे २०२२ रोजी ही पदोन्नती मंजूर केली आणि १ जून २०२२ पासून निकम यांनी शहर अभियंता(Makarand Nikam Vrs ) पदाचा कार्यभार स्वीकारला.
त्यांच्या कार्यकाळात महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली. रस्तेविकास, पायाभूत सुविधा उभारणी, इमारत विकास तसेच मोठ्या तांत्रिक प्रकल्पांना त्यांनी मंजुरी देत अंमलबजावणीत वेग आणला. अनेक प्रकल्प सध्या ( Makarand Nikam Vrs)अंतिम टप्प्यात आहेत.
