Home गुन्हे Pimple Nilakh Crime:पिंपळे निलखमध्ये कचऱ्यात नवजात मुलीचा मृतदेह आढळला | चिंचवड हादरले

Pimple Nilakh Crime:पिंपळे निलखमध्ये कचऱ्यात नवजात मुलीचा मृतदेह आढळला | चिंचवड हादरले

चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात कचऱ्यात नवजात मुलीचे अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

by Admin
Spread the love

चिंचवड शहरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपळे निलख परिसरात एका अज्ञात व्यक्तीने कचऱ्यात नवजात अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही चिमुकली अर्भक स्त्री जातीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली (Pimple Nilakh Crime) आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दुर्दैवाने या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या अमानवी कृत्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला (Pimple Nilakh Crime) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00