Home तंत्रज्ञान PCMC Industries:पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांसाठी पुण्यात ८ डिसेंबर रोजी विभागीय परिषद

PCMC Industries:पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांसाठी पुण्यात ८ डिसेंबर रोजी विभागीय परिषद

एमएसएमई-डीएफओ मुंबई आयोजित ‘एमएसएमईच्या खर्च आणि स्पर्धात्मकतेवर’ विभागीय परिषद ८ डिसेंबर 2025 रोजी पुण्यात होत आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे आवाहन

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघु उद्योगांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे करण्यात आले आहे. एमएसएमई–डीएफओ मुंबई यांच्या वतीने ‘भारतातील एमएसएमईच्या खर्च आणि स्पर्धात्मकतेवर’ या विषयावर विभागीय परिषद (Zonal Conference) पुणे येथे ८ डिसेंबर २०२५ (PCMC Industries(रोजी आयोजित केली आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने देशातील एमएसएमई क्षेत्रातील खर्चकपात, स्पर्धात्मकता वाढ आणि आव्हानांची ओळख पटवण्यासाठी देशव्यापी ‘एमएसएमई संवाद’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात देशभरातील ७५ ठिकाणी क्लस्टर-स्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या कार्यशाळांना उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेक महत्त्वपूर्ण( PCMC Industries)सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ११ विभागीय परिषदा होणार असून, महाराष्ट्रातील परिषद पुण्यात होणार आहे. येथील चर्चेचा उपयोग राष्ट्रीय पातळीवरील शिखर परिषदेसाठी माहिती आणि शिफारसी तयार करण्यात होईल. राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होण्याची(PCMC Industries) अपेक्षा आहे.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि सचिव जयंंत कड यांनी उद्योजकांना आवाहन करताना सांगितले की, “एमएसएमई क्षेत्रातील आव्हाने, खर्चात कपात आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी उद्योजकांची प्रत्यक्ष सहभागातून मांडली जाणारी मते अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणूनच सर्व उद्योजकांनी या परिषदेला उपस्थित राहून मौल्यवान सूचना (PCMC Industries)द्याव्यात.”

परिषदेचे ठिकाण : क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, प्लॉट नं. J/P–10, निगडी-भोसरी रोड, भोसरी MIDC, पुणे – 411026
दिनांक : ८ डिसेंबर २०२५
वेळ : सकाळी १०.०० वा.

संपर्क :
श्री. एन. एन. इस्तोलकर – ९७६८६८६२५०
श्री. अभय दप्तदार – ९६१९९२७४५३

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00