Home पुणे PCMC Indira Gandhi Jayanti :पिंपरी चिंचवड महापालिकेत इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; अधिकारी–कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

PCMC Indira Gandhi Jayanti :पिंपरी चिंचवड महापालिकेत इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; अधिकारी–कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

by Admin
Spread the love

पिंपरी, प्रतिनिधी :भारताच्या माजी पंतप्रधान व भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली. “देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय ऐक्य कायम राखण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करू. कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराचा अवलंब करणार नाही आणि धार्मिक, भाषिक, प्रादेशिक मतभेद तसेच इतर राजकीय–आर्थिक तक्रारी शांततामय आणि संविधानानुसार मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करू,” असा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. या शपथविधीचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

 

कार्यक्रमाला उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांसह विविध विभागांतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

शपथेचे वाचन आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00