( विशेष लेख )महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची भक्कम पायाभरणी केली. कृषी, औद्योगिक, सहकार, साहित्य, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पाटबंधारे अशा विविध क्षेत्रांतील मूलभूत विकासाला चालना देणारी व दूरगामी परिणाम साधणारी धोरणे त्यांनी राबविली. म्हणूनच त्यांना महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार ही बिरुदावली शोभून दिसते. देशाच्या नकाशावर आणि देशाबाहेरही नामांकित उद्योगनगरी म्हणून पिंपरीचिंचवड चा नावलौकिक आहे. या उद्यमनगरीचे उद्गातेही तेच मानले (Yashvantrav Chavhan) जातात.
यशवंतराव चव्हाण यांनी विद्यार्थी दशेतच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. ऐन तारुण्यात वकिलीची सनद असतानाही त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला अग्रक्रम दिला. भूमिगत चळवळीतील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी मोठे बक्षीस जाहीर केले होते. फलटणच्या मोरे कुटुंबातील वेणूताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला पोलिसांनी वेणूताई यांना यशवंतराव कुठे आहेत अशी विचारणा केली. मात्र त्यांनी देशभक्त पतीचा ठावठिकाणा सांगितला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कैदेत टाकले व छळ केला. त्या छळामुळे त्यांना गर्भाशयाचा विकार झाला आणि त्यांना कधीही अपत्यप्राप्ती झाली नाही. मातृभूमीसाठी लढताना कौटुंबिक आयुष्यात सोसलेल्या या यातनांची त्यांनी कधीही वाच्यता केली (Yashvantrav Chavhan)नाही.
देशातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर १९४६ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत ते सातारा जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर सामाजिक व राजकीय जीवनात त्यांच्या यशाची कमान सातत्याने वाढत गेली. त्याकाळच्या मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळातील त्यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली. १९५७ मध्ये ते द्वैभाषिक मुंबई राज्याचे (महाराष्ट्र व गुजरात) मुख्यमंत्री झाले. त्या काळात महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक विकासाला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय त्यांनी(Yashvantrav Chavhan) घेतले.
महाराष्ट्राच्या विकासाची जननी ठरलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या कोयना डॅम प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी दूरदृष्टीने केली. सिंचन आणि वीजनिर्मितीत कोयना प्रकल्पाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात आघाडीचे राज्य म्हणून ओळख मिळू (Yashvantrav Chavhan) शकली.

पूर्वी मुंबईबाहेर फारसे उद्योगधंदे नव्हते. ते पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरात आणण्यात कै. चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती. टाटा Group , किर्लोस्कर ग्रुप , गरवारे ग्रुप , बजाजग्रुप , रुस्टन & हॉर्न्सबी यांसारख्या उद्योगसमूहांसह अनेक परदेशी उद्योगांना त्यांनी येथे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. शासकीय पातळीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. स्थानिक पातळीवर त्याकाळी कै. अण्णासाहेब मगर यांच्यासारखे कणखर नेतृत्व होते. त्यांना विश्वासात घेऊन औद्योगिकीकरणाला चालना देण्यात आली. त्यामुळे लाखो हातांना रोजगार मिळाला आणि राज्याच्या विविध भागांतून नागरिक या परिसरात स्थायिक झाले. औद्योगिकीकरणामुळे येथील खेड्यांचे रूपांतर होऊन आजचे पिंपरी-चिंचवड महानगर विकसित (Yashvantrav Chavhan) झाले.
भारत सरकारच्या मालकीचा पेनिसिलीन कारखाना म्हणजे आजची हिंदुस्थान एन्टीबीओटीक्स लिमिटेड कंपनी पिंपरी येथे आणण्यात कै. काकासाहेब गाडगीळ यांच्या बरोबरीने कै. चव्हाण यांचीही महत्त्वाची भूमिका होती. पुढील काळातही या कारखान्याच्या स्थैर्यासाठी त्यांनी विशेष लक्ष(Yashvantrav Chavhan) दिले.
संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या आंदोलनाला त्यांनी मुत्सद्दीपणे पाठबळ दिले. जवाहरलाल नेहरू यांचे ते विश्वासू सहकारी होते. १ मे १९६० रोजी मुंबईसह विदर्भाचा समावेश असलेले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आणि ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (Yashvantrav Chavhan) झाले.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या जडणघडणीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. गावोगावी माध्यमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. सर्वसामान्य कुटुंबांतील शेतकरी व कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक मागास सवलत (EBC) योजना सुरू केली. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी Maharashtra Industrial Development Corporation (एमआयडीसी) ची स्थापना करण्यात आली. त्याद्वारे राज्यभर औद्योगिक वसाहती उभारल्या (Yashvantrav Chavhan) गेल्या.
उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून राज्यभर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) जाळे उभारले गेले. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध (Yashvantrav Chavhan) झाल्या.
त्यांच्या काळात Dr. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि शिवाजी युनिव्हर्सिटी यांसारख्या विद्यापीठांची स्थापना झाली. कृषी विकासासाठी विविध कृषी विद्यापीठे उभारली गेली. सहकार चळवळीला चालना देत अनेक सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यात(Yashvantrav Chavhan) आली.
तसेच उजनी डॅम आणि जायकवाडी डॅम यांसारख्या मोठ्या धरण प्रकल्पांना चालना देण्यात आली. राज्यभर मध्यम सिंचन प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे कृषी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना(Yashvantrav Chavhan) मिळाली.
राज्याचा विकास केवळ भौतिक व आर्थिक नसून सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध असावा, ही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी कला, साहित्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले. तर्कथिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विश्वकोष मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. साहित्य संस्कृती मंडळाचीही निर्मिती करण्यात (Yashvantrav Chavhan) आली.
कुस्ती, कबड्डी आणि खो-खो यांसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात आले. कलाकार, साहित्यिक आणि खेळाडूंचा सन्मान करण्याची परंपरा त्यांनी रुजवली. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, या भूमिकेतून पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्यात (Yashvantrav Chavhan) आली.
नोव्हेंबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यांनी प्रत्यक्ष सीमाभागाला भेट देऊन सैनिकांचे मनोबल वाढविले व देशाची संरक्षणसिद्धता मजबूत (Yashvantrav Chavhan) केली.
पुढील काळात त्यांनी भारताचे अर्थमंत्री, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणूनही प्रभावी कामगिरी केली. इंदिरा गांधी यांच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या निर्णयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्रमंत्री म्हणून विविध देशांशी भारताचे संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी मुत्सद्दीपणे प्रयत्न केले. जागतिक स्तरावर एक अभ्यासू व दूरदर्शी राजकारणी म्हणून त्यांची ओळख निर्माण (Yashvantrav Chavhan) झाली.
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसची पडझड होत असतानाही ते पुन्हा निवडून आले आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. पुढे मोरारजी देसाई यांचे सरकार पडल्यानंतर चरण सिंग पंतप्रधान झाले आणि कै. यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान(Yashvantrav Chavhan) झाले.
राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावत असतानाही जनमानसातील त्यांची लोकप्रियता कायम राहिली. सामान्य माणसाला आधार देणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. कलाकार, खेळाडू, साहित्यिक आणि विद्वानांविषयी त्यांना विशेष आदर (Yashvantrav Chavhan) होता.
माझ्या महाविद्यालयीन काळात १९८३ साली कै. चव्हाण साहेबांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मला मिळाली. त्यांनी मला भेट दिलेले “यशवंतराव : इतिहासाचे एक पान” हे पुस्तक आजही त्यांच्या विचारांची आठवण करून देणारा अमूल्य ठेवा म्हणून जपून ठेवले(Yashvantrav Chavhan) आहे.
आयुष्यभर लोकसेवेसाठी कार्यरत राहिलेले स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त, महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भारतीय राजकारणातील एक धुरंधर नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी होते. ते संवेदनशील, दूरदर्शी, अभ्यासू आणि निःस्वार्थ वृत्तीचे लोकनेते होते. गरीबीची जाणीव आणि गरीबांबद्दलची कणव असलेला हा नेता साहित्यिक, द्रष्टा आणि बुद्धिमान राजकारणी म्हणून जनमानसात आजही अढळ स्थान राखून (Yashvantrav Chavhan) आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
लेखक – अरुण बोऱ्हाडे
(कै. यशवंतराव चव्हाण चरित्र (Yashvantrav Chavhan) अभ्यासक)
मोबाईल – ९८८१३०१३३९
ईमेल – atborhade@gmail.com
