Home महाराष्ट्र Sunetra Pawar :बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला

Sunetra Pawar :बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी १.८९ लाख मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवत अजित पवारांचा २०१९ चा विक्रम मोडला. एकतर्फी निकाल, मतदानाची आकडेवारी आणि राजकीय विश्लेषण जाणून घ्या.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दमदार कामगिरी करत अजित पवार यांच्या २०१९ मधील विक्रमी मताधिक्यालाही मागे टाकत नवा इतिहास रचला. मतमोजणीच्या २०व्या फेरीअखेर त्यांनी तब्बल १ लाख ८९ हजार मतांची आघाडी घेत निर्णायक विजय संपादन (Sunetra Pawar) केला.

 

२०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी १,६५,२६५ मताधिक्य मिळवत विक्रम केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी हा टप्पा ओलांडत बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१९ मध्ये ७० टक्के मतदानात त्यांनी १,९५,६४१ मते मिळवली होती. त्याआधी २०१४ मध्ये १,५०,५८८ मते व ८९,७९१ मताधिक्य, तर २००९ मध्ये ६८ टक्के मतदानात १,२८,५४४ मते आणि १,०२,७९७ मताधिक्य अशी त्यांची कामगिरी (Sunetra Pawar)  होती.

 

२०२४ मध्येही बारामतीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. त्या वेळी ७१.८६ टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि अजित पवार यांनी १,८१,१३२ मते मिळवत १ लाख १ हजार मताधिक्याने विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर, पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी घेतलेली सुमारे १.६८ लाखांहून अधिक आघाडी ही केवळ विजय नसून ऐतिहासिक टप्पा मानली जात (Sunetra Pawar) आहे.

 

या पोटनिवडणुकीत एकूण २,२३,७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेली १,२३,२६५ मतांची मर्यादा त्यांनी सहज पार केली. निकालाचा कल सुरुवातीपासूनच एकतर्फी दिसून (Sunetra Pawar) आला.

 

विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून ठळक उमेदवार नसल्याने लढत तुलनेने एकतर्फी ठरल्याचे चित्र दिसले. त्यामुळे विक्रमी मताधिक्याचा दावा ठळक असला, तरी निकालाची खरी ताकद ही मतदारांची प्रत्यक्ष पसंती आणि मतदानाच्या प्रमाणावरच अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत(Sunetra Pawar)  आहे.

 

दरम्यान, विजयाचा जल्लोष साजरा करू नये, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. “दादांच्या आठवणींनी आपण भावूक आहोत, त्यामुळे कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच, “दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार. हा शेवट नसून नव्या बारामतीच्या निर्धाराची ही सुरुवात आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त (Sunetra Pawar) केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00