पुणे : अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने देशसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीर पत्नी आणि वीर माता श्रीमती सुमेधाताई चिथडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सुमेधाताईंच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास समाजासमोर उलगडण्यात आला. सुमारे दोन तासांचा कार्यक्रम तीन तासांहून अधिक काळ चालला, तरीही उपस्थित श्रोते तल्लीन होऊन त्यांच्या अनुभवांना ऐकत (Soldier Welfare) राहिले.
देशसेवेची जिद्द मनात बाळगून सुमेधाताई चिथडे आणि त्यांचे पती स्वर्गीय योगेश चिथडे यांनी भारतीय सैन्याविषयी असलेली आपली निष्ठा कृतीतून सिद्ध केली. वीरमरण पत्करलेल्या दोन सैनिकांच्या पत्नींचा सांभाळ करून त्यांच्या आयुष्याला आधार देण्याचे काम त्यांनी केले. सियाचेन येथे तैनात असलेल्या सैनिकांना ऑक्सिजनच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे समजताच तेथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा त्यांनी निर्धार (Soldier Welfare) केला.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी निधी उभारण्यासाठी सुमेधाताईंनी स्वतःचे दागिने विकले आणि ‘पावनभिक्षा’ उपक्रम सुरू केला. लोकसहभागातून निधी गोळा करून त्यांनी Soldiers Independent Rehabilitation Foundation (SIRF) या संस्थेची स्थापना केली. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ४ ऑक्टोबर २०१९ रोजी सियाचेनमध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यश मिळाले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही दुसरा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात(Soldier Welfare) आला.
या कार्यादरम्यान सियाचेनच्या कठीण वातावरणाचा परिणाम त्यांचे पती योगेश चिथडे यांच्या प्रक्रूतीवर झाला आणि जुलै २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र या वैयक्तिक दुःखानंतरही सुमेधाताईंनी सैनिकांसाठीचे कार्य थांबवले नाही. त्यांनी मिलिटरी हॉस्पिटलसाठी सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम, अपंग सैनिकाच्या मुलीसाठी व्हीलचेअर, सैनिकांच्या मुलांच्या शाळेसाठी बस अशा विविध प्रकारच्या मदतीचे उपक्रम राबवले. तसेच सैनिकांना राख्या, दिवाळी फराळ आणि कोविड काळात मास्क पाठवण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले(Soldier Welfare) आहे .
या कार्यक्रमात बोलताना सुमेधाताईंनी समाजासमोर राष्ट्रप्रेमाबाबतही आपली भूमिका मांडली. राष्ट्र प्रथम या भावनेतून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांचे योगदान समाजाने नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. विश्वचषक जिंकल्यावर जसा जल्लोष होतो, तसाच जल्लोष भारतीय सैन्याच्या पराक्रमाचाही व्हायला हवा. आपल्या मुलांना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद (Soldier Welfare)केले.
यापुढेही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध योजना राबवण्याचा त्यांचा मानस असून समाजाने या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. सैनिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुढील उपक्रमांची अधिक माहिती किंवा या कार्यात सहभागी होण्यासाठी sirf.org.in या संकेतस्थळाला भेट देण्याचेही त्यांनी (Soldier Welfare)सांगितले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला पिंगळे व कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन (Soldier Welfare)केले.
(सौजन्य :जगदीश विसपुते,सुभाष चव्हाण )
