देहूरोड (पुणे) – आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात मंगळवारी (५ मे) संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी सुमारे ८ वाजता हिल टॉप परिसर आणि बेस्टन नंबर १४ जवळ बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रात्री सुमारे १० वाजताही त्याचे पुन्हा दर्शन झाल्याचे स्थानिकांनी (Leopard Sighting) सांगितले.
या घटनेनंतर आयुध निर्माणी इस्टेटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यसमितीने तातडीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याचे आणि रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले (Leopard Sighting)आहे.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. तसेच, सीडब्ल्यू (CW) मधून पाणी सोडण्याच्या कामावेळी सुरक्षा वाढवण्यासाठी डीएससी (DSC) जवानांची मदत घेण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात (Leopard Sighting)आले.

दरम्यान, संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन आणि वन विभागाकडून पुढील कारवाईची प्रतीक्षा(Leopard Sighting) आहे.
