प्राधिकरण, निगडी : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि मधुमेह रुग्ण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. संत तुकाराम उद्यान येथे बुधवारी (१ जुलै) सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती (Doctors Day Celebration)लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सौ. अलका कणखर यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिरुद्ध टोणगावकर यांचा सत्कार करण्यात आला. मधुमेह रुग्ण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले यांनी प्रास्ताविक केले, तर प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या दोघांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. टोणगावकर यांचा परिचय सौ. आशा नष्टे यांनी करून (Doctors Day Celebration)दिला.
मार्गदर्शन करताना डॉ. अनिरुद्ध टोणगावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारे विविध आजार, त्यामागील कारणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. चंद्रकांत वाळके, डॉ. दिलीप सोनवणे आणि डॉ. विकास मंडलेचा यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातील डॉ. गुणवंत चिखलीकर, डॉ. दिगंबर इंगोले, डॉ. अरविंद वाघचौरे, डॉ. दामोदर बराटे, डॉ. रजनी जैन, डॉ. माऊली फरांदे आणि डॉ. प्रमिला उन्नरकर यांचाही सत्कार करण्यात (Doctors Day Celebration)आला.

कार्यक्रमाला नगरसेविका शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका भारती फरांदे तसेच संघाचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभदा मेंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र मिसाळ यांनी केले. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता (Doctors Day Celebration)झाली
