पिंपरी, दि. १६ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘आर.आर.आर. (Reduce, Reuse, Recycle)’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या एका महिन्यात शहरातील विविध केंद्रांवर ४५३ पुनर्वापरयोग्य वस्तू जमा करण्यात आल्या आहेत. या वस्तूंचे एकूण वजन ६२८.७५ किलो इतके असून, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाद्वारे पर्यावरण संवर्धनाला महत्त्वाची चालना मिळत (Reduc Reuse Recycle)आहे.
महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रांवर नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू स्वेच्छेने जमा केल्या. यात खेळणी, पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुनर्वापर होऊन कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे. तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन मिळत (Reduc Reuse Recycle)आहे.
‘कमी वापरा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा’ हा पर्यावरणपूरक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आर.आर.आर. उपक्रम प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून पुनर्वापराची सवय, कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक बळकट होत असल्याचे महापालिका प्रशासनाने (Reduc Reuse Recycle)सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, आर.आर.आर. केंद्रांमुळे नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वापरात नसलेल्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्या पुनर्वापरासाठी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी(Reduc Reuse Recycle) व्हावे.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनाबाबत वाढत असलेल्या जागरूकतेचे द्योतक आहे. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील (Reduc Reuse Recycle)आहे.
उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही नागरिकांना शहरातील आर.आर.आर. केंद्रांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. घरातील वापरण्यायोग्य वस्तू या केंद्रांवर जमा करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले (Reduc Reuse Recycle)आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण ही केवळ स्वच्छतेची संकल्पना नसून पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ आहे. आर.आर.आर. उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंना नवे आयुष्य मिळत असून ‘कचऱ्यातून संसाधन’ निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ मिळत आहे. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद (Reduc Reuse Recycle)केले.
