Home गुन्हे Crime News Nigdi:तडीपार आरोपी कोयत्यासह निगडीत अटकेत; शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा

Crime News Nigdi:तडीपार आरोपी कोयत्यासह निगडीत अटकेत; शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा

तडीपार असतानाही बंदी हद्दीत प्रवेश; कोयता बाळगत फिरणाऱ्या आरोपीवर निगडी पोलिसांची कारवाई

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीला कोयता बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन आणि तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Crime News Nigdi) आहे.

 

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचारी प्रदीप पावरा यांनी फिर्याद दिली आहे. गोपाळ अंकुश हळनोर (वय २५, रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव (Crime News Nigdi) आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील क्रांतीनगर परिसरातील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे सार्वजनिक रस्त्यावर आरोपी संशयास्पद हालचाली करत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून (Crime News Nigdi)आला.

 

तपासादरम्यान, संबंधित आरोपीला यापूर्वीच पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तो पुन्हा बंदी असलेल्या हद्दीत आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक (Crime News Nigdi)केली.

 

या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत (Crime News Nigdi)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00