Home पुणे Kavyadeep Puraskar 2026:मीना शिंदे यांना काव्यदीप पुरस्कार 2026; पिंपरीतील ज्येष्ठ कवयित्रीचा सन्मान

Kavyadeep Puraskar 2026:मीना शिंदे यांना काव्यदीप पुरस्कार 2026; पिंपरीतील ज्येष्ठ कवयित्रीचा सन्मान

पिंपरी-चिंचवडमधील कवयित्री मीना शिंदे यांना ‘काव्यदीप पुरस्कार 2026’ प्रदान. पुण्यातील साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित सोहळ्यात गौरव, साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. २७ मार्च २०२६) : पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ कवयित्री व गझलकारा मीना शिंदे यांना ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. गुरुवारी (दि. २६ मार्च) स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात (Kavyadeep Puraskar 2026)आला.

 

हा कार्यक्रम साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदच्या कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या. तसेच साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती (Kavyadeep Puraskar 2026) होती.

 

प्रास्ताविकात ज्योत्स्ना चांदगुडे यांनी सांगितले की, मीना शिंदे गेली सुमारे ३५ वर्षे आशयघन कविता आणि गझल लेखन करत असून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला (Kavyadeep Puraskar 2026)आहे.

 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मीना शिंदे म्हणाल्या, “साहित्यदीप प्रतिष्ठानसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून आणि माझ्या आवडत्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते हा सन्मान मिळणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कवितेबरोबरच गझलेतही विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असून, पुढेही साहित्य क्षेत्रात नवे टप्पे गाठण्याची इच्छा (Kavyadeep Puraskar 2026)आहे.”

 

अध्यक्षीय भाषणात अंजली कुलकर्णी यांनी मीना शिंदे यांच्या लेखनाचे कौतुक करत, “त्यांच्या रचनांमध्ये उत्तम शब्दकळा, सकारात्मक विचार, समृद्ध आशय आणि तंत्रशुद्धता यांचा सुंदर मिलाफ आढळतो,” असे गौरवोद्गार (Kavyadeep Puraskar 2026)काढले.

 

सोहळ्यानंतर ‘स्पंदन’ या महिला कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सत्रात ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, मीरा शिंदे, मृणालिनी कानिटकर, प्राजक्ता वेदपाठक, चिन्मयी चिटणीस, ललिता सबनीस, मृदुला कुलकर्णी-खैरनार, सविता इंगळे, तरूजा भोसले, रेखा येळंबकर, शीला टाकळकर, राजश्री सोले आणि मीना शिंदे यांनी स्त्रीजाणिवांवर आधारित स्वरचित कवितांचे सादरीकरण (Kavyadeep Puraskar 2026)केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरूपमा महाजन यांनी केले, तर पुरस्कार सोहळ्याचे निवेदन ऋचा कर्वे यांनी केले. शेवटी प्रतिभा पवार यांनी आभार प्रदर्शन(Kavyadeep Puraskar 2026) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00