Home गुन्हे Kalewadi Accident:काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन बहिणींचा मृत्यू

Kalewadi Accident:काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन बहिणींचा मृत्यू

काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील ऋतुजा व नेहा शिंदे या दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन बहिणींचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०, रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावे (Kalewadi Accident)आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि नेहा या दुचाकीवरून प्रवास करत असताना काळेवाडी परिसरात भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित( Kalewadi Accident)केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत(Kalewadi Accident) आहेत.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला (Kalewadi Accident)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00