पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील अखेरच्या बेपत्ता नागरिकाचा शोध रविवारी पहाटे लागला. सुमारे ८४ तास अखंड सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान रात्री १ वाजण्याच्या सुमारास वामन कसबे यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ वर पोहोचली असून शोधमोहीम अखेर पूर्ण झाली (Moshi Search Operation)आहे.
मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर ८ जुलै रोजी दुपारी कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी १४ जणांना विविध टप्प्यांत सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले, तर उर्वरित ९ जणांचा मृत्यू (Moshi Search Operation)झाला.
दुर्घटनेनंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणांनी दिवस-रात्र बचाव व शोधकार्य सुरू ठेवले. अस्थिर आणि धोकादायक इमारतीमुळे बचावकार्यात अनेक अडचणी आल्या. अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर, पोकलेन, जेसीबी, डंपर आणि श्वान पथकाच्या मदतीने ढिगारा हटवून शोधकार्य सुरू ठेवण्यात (Moshi Search Operation)आले.
शनिवारी सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर अखेर रविवारी पहाटे वामन कसबे यांचा मृतदेह हाती लागल्याने सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाला. त्यानंतर प्रशासनाने ८४ तास सुरू असलेली शोधमोहीम समाप्त झाल्याची माहिती (Moshi Search Operation)दिली.

