Home आरोग्य Sunetra Pawar:मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; बचावकार्याचा आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

Sunetra Pawar:मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; बचावकार्याचा आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. बाधितांच्या नातेवाईकांशी संवाद साधून प्रशासनाला सूचना.

by Admin
Spread the love

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ११ जुलै) घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच बाधितांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर (Sunetra Pawar) दिला.

 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित(Sunetra Pawar) होते.

 

माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मोशी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी असून, घटनेच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले आहे. तातडीने एनडीआरएफला घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसह विविध माध्यमांतून प्रशासनाच्या संपर्कात राहून बचावकार्याचा सातत्याने आढावा(Sunetra Pawar) घेतला.”

 

त्या पुढे म्हणाल्या, “कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तसेच बाहेर काढण्यात येणाऱ्या मृतदेहांचा सन्मानपूर्वक व्यवहार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या (Sunetra Pawar) आहेत.”

 

दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात (Sunetra Pawar) आहे.”

नातेवाईकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “बाधित कुटुंबांच्या भावना, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. राज्य शासन, महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या संयुक्त बैठकीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात (Sunetra Pawar) येईल.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00