Home गुन्हे Voter bribery:प्रभाग १७ मध्ये पैशांचा खेळ उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता रंगेहाथ पकडला

Voter bribery:प्रभाग १७ मध्ये पैशांचा खेळ उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता रंगेहाथ पकडला

प्रेमलोक पार्क–भोईरनगर–इंदिरानगरमध्ये मोठा राडा**

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच शहरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर–प्रेमलोक पार्क–भोईरनगर) अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले  (Voter bribery) आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पाकिटांमधून रोख रक्कम वाटप करण्याचा प्रकार गुप्तपणे सुरू होता. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ विरोध दर्शवला. यावेळी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत संशयितांना (Voter bribery) घेराव घातला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रोख रक्कम तसेच मतदारांच्या याद्या सापडल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेनंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. काही काळासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले(Voter bribery) होते.

लोकशाहीची थट्टा” – संतप्त प्रतिक्रिया

“पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची उघड थट्टा आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रभागात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचेही नागरिकांनी सांगितले असून, आज त्या हालचालींचा पर्दाफाश झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत (Voter bribery) आहे.

भाजपकडून कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे उमेदवार नामदेव ढाके म्हणाले,

“एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पैशांचे आमिष दाखवून मते मिळवायची—हा राष्ट्रवादीचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने आणि कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी (Voter bribery) केली.

पोलिस व भरारी पथक दाखल

घटनेची माहिती मिळताच निवडणूक भरारी पथक आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेचा पंचनामा सुरू आहे. आचारसंहितेचा भंग आणि मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने (Voter bribery) दिले आहेत.

या प्रकारामुळे प्रभाग १७ मधील निवडणूक प्रचाराला तीव्र वळण लागले असून, पुढील घडामोडींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले (Voter bribery) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00