Home पुणे Voting Awareness:चला आपण मतदान करूया!” – नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

Voting Awareness:चला आपण मतदान करूया!” – नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले आहे. मतदान न करण्याची प्रवृत्ती, नोटा आणि मतदारांची जबाबदारी यावर परखड भाष्य. वाचा सविस्तर बातमी.

by Admin
Spread the love

पुणे | प्रतिनिधी:लोकशाही व्यवस्थेतील सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे मतदानाचा हक्क असून, तो प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वापरावा, असे आवाहन प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे माजी प्राचार्य, जेष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या सविस्तर पत्रातून मतदारांची उदासीनता, ‘नोटा’चा गैरवापर आणि मतदान न करण्याची वाढती प्रवृत्ती यावर परखड भाष्य केले (Voting Awareness) आहे.

पत्रात डॉ. कांकरिया म्हणतात की, मतदान न करणे हा देखील एक प्रकारचा निर्णय असतो, मात्र तो लोकशाहीसाठी घातक ठरतो. “डॉक्टरकडे आजार घेऊन गेल्यावर योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुढच्या वेळी डॉक्टरकडेच जायचे नाही, असा विचार कोणी करत नाही. तसेच एखादा राजकारणी अपेक्षांवर खरा उतरला नाही म्हणून मतदानच टाळणे योग्य नाही,” असा उदाहरणासह त्यांनी मुद्दा स्पष्ट (Voting Awarenessकेला.

मतदान ही लोकशाहीची मुळं

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून, तो अधिकार वापरणे हे केवळ हक्क नव्हे तर कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि न्याय या मूल्यांवर उभी असलेली आपली व्यवस्था टिकवायची असेल, तर मतदानातूनच योग्य प्रतिनिधी निवडले गेले पाहिजेत,” असे त्यांनी नमूद (Voting Awarenessकेले.

नोटा’वर स्पष्ट भूमिका

‘नोटा’ (NOTA) बाबतही त्यांनी स्पष्ट मत मांडले. सर्व उमेदवार वाईटच आहेत, या भावनेतून नोटाचा वापर वाढत असला, तरी त्यामुळे प्रत्यक्षात बदल घडत नाही. “नोटा हा राग व्यक्त करण्याचा मार्ग असू शकतो, पण तो उपाय नाही. योग्य उमेदवार शोधून त्याला मतदान करणे हाच खरा लोकशाही मार्ग आहे,” असे ते (Voting Awarenessम्हणतात.

सामाजिक प्रश्नांवर चिंतन

देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे भविष्य, महिला सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधत डॉ. कांकरिया यांनी सांगितले की, हे प्रश्न सोडवायचे असतील तर सक्षम, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले प्रतिनिधी निवडणे अत्यावश्यक (Voting Awarenessआहे.

मतदान टाळू नका”

पत्राच्या शेवटी त्यांनी नागरिकांना थेट साद घातली आहे.

“कोणी मत विकत घेण्याचा, दबाव टाकण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला बळी पडू नका. कोणत्याही आमिषाला भुलू नका. विचारपूर्वक, निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे मतदान करा. मतदान न करता दूर राहणे हा पर्याय नाही, कारण त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात,” असे आवाहन त्यांनी केले (Voting Awareness)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00