पिंपरी, दि. २६ जानेवारी २०२६ :आकाशात अभिमानाने फडकणारा तिरंगा, सभोवताली देशभक्तीच्या घोषणांनी आणि सुरांनी भारलेले वातावरण, तसेच ‘ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू’, ‘दिल दिया है, जान भी देंगे ये वतन तेरे लिये’, ‘आय लव्ह माय इंडिया’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’ यांसारख्या देशप्रेम जागवणाऱ्या गीतांची सुरेल मेजवानी… असा देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रभावी आविष्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आयोजित ‘झेंडा उंचा रहे हमारा’ या विशेष कार्यक्रमात अनुभवायला (PCMC Republic Day) मिळाला.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आयोजित देशभक्तीपर गीतांच्या विशेष कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (PCMC Republic Day)लाभला.

देशभक्तीपर गीतांचा आनंद घेण्यासाठी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (PCMC Republic Day) होते.
